कोल्हापूरची पोटनिवडणूक पंचरंगी; करूणा शर्मा, अभिजित बिचुकलेही रिंगणात

काँग्रेस Congress आमदार MLA चंद्रकांत जाधव Late Chandrakant Jadhav यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर Kolhapur North विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक होणार आहे.
Abhijit Bichukale, Karuna Sharma
Abhijit Bichukale, Karuna Sharmasarkarnama

कोल्हापूर : बिनविरोध होणार अशी चर्चा असलेली कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक पंचरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेस- भाजपा हे प्रमुख पक्ष असले तरी करुणा शर्मा आणि अभिजित बिचुकले हेही रिंगणात उतरणार असल्याने ही निवडणूक चर्चेची होणार आहे.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक होणार आहे. कै. चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूनंतर ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी घोषणा काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी निश्चित करून भाजप कामालाही लागले आहे.

Abhijit Bichukale, Karuna Sharma
कोल्हापूर 'उत्तर'साठी काँग्रेसचा 'डाव'; भाजपच्या पराभवासाठी सेनेचा उमेदवार उभा करायचा

काँग्रेसकडून आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडणूक रिंगणात असणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपाकडून कोण असेल याची उत्सुकता होती. सत्यजित कदम यांच्या रूपाने भाजपाने तगडा उमेदवार मैदानात आणला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यात एकही भाजपचा आमदार नसल्याची खंत चंद्रकांत पाटील यांना होती ती भरून काढण्यासाठी आता भाजपाने कंबर कसली आहे.

Abhijit Bichukale, Karuna Sharma
बिबट्या सफारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात होणार बैठक

काँग्रेसही कोल्हापूर उत्तर मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न करणार हे निश्चित आहे. काँग्रेस बरोबरच पंजाब निवडणुकीत सत्ता आल्याने आत्मविश्वास वाढलेल्या आम आदमी पार्टीने ही संदीप देसाई यांना रिंगणात उतरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'आप'ने तर प्रचाराची पहिली फेरी पूर्ण ही केली आहे. या तिन्ही उमेदवाराबरोबरच करुणा शर्मा या शिवशक्ती सेना पक्षाच्यावतीने लढणार आहेत. महिलांच्या हक्कासाठी त्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Abhijit Bichukale, Karuna Sharma
Video: आर्थिक निकषांवर आरक्षण देऊन टाका; उदयनराजे भोसले

याबरोबरच आतापर्यंत अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले साताऱ्याचे अभिजित बिचुकले ही रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागणार हे स्पष्ट असल्याने शिवसेना आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता नाही. तरीही कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप असे धुमशान रंगणार हे स्पष्ट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in