जयंतराव हे सुसंस्कारी नेते; लक्षात ठेवा माझ्याकडे तुमचा फेरफारच आहे...

सध्या त्यांच्या पक्षात NCP काही नवीन विद्वान लोक Learned people आलेले आहेत. त्यांना सत्ता मिळावी, यासाठी त्यांनी जयंतरावांचा Jayant Patil वापर करण्यास सुरवात केली आहे.
Anil Babar, Jayant Patil
Anil Babar, Jayant Patilsarkarnama

विटा : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे सुसंस्कारी नेते असून त्यांच्या तोंडून मंत्री, संत्री असे शब्द येणार नाहीत, याची मला खात्री आहे. त्यांच्या पक्षातील बगलबच्च्यांनीच जयंतरावांच्या तोंडी हे शब्द घातले असावेत. पण त्यांच्याकडे माझा सातबारा असेल तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी दिला आहे.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना घाबरू नका, मंत्री, संत्री कोणीही होऊ द्यात. माझ्याकडे सगळ्यांचा सातबारा आहे, असे सूचक विधान केले होते. त्यावर आमदार बाबर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्री. पाटील यांना प्रत्युत्तर दिले.

Anil Babar, Jayant Patil
इस्लामपूर : निशिकांत पाटील यांनी जयंत पाटलांना अक्षरशः धारेवर धरले...

आमदार बाबर म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुसंस्कारी नेते असून ते एका मोठ्या नेत्यांचे चिरंजीव आहेत. गेल्या ३० वर्षांपासून माझे व त्यांचे संबंध आहेत. ते स्वतः मंत्री होते. त्यामुळे त्यांच्या तोंडून मंत्री, संत्री असे शब्द येणार नाहीत, याची मला खात्री आहे. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत.

Anil Babar, Jayant Patil
नशिबात असेल तर मंत्रिपद मिळून जाईल... अनिल बाबर

आमदार बाबर म्हणाले, जी पदे घटनेने दिली आहेत ती मंत्रिपदे जयंत पाटील यांनी स्वतः भोगलेली आहेत. त्या पदाबद्दल ते या पध्दतीने बोलतील, असे वाटत नाही. सध्या त्यांच्या पक्षात काही नवीन विद्वान लोक आलेले आहेत. त्यांना सत्ता मिळावी, यासाठी त्यांनी जयंतरावांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. त्यांनीच हे सर्व पसरविले आहे.

Anil Babar, Jayant Patil
सांगली महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत वादावर चंद्रकांतदादा अंतिम निर्णय घेणार!

परंतू, मी कुजक्या मनोवृत्तीचा नाही. जयंतरावांसारख्या चांगल्या माणसाच्या तोंडी असे शब्द घालणे हे राजकियदृष्ट्या शोभनिय नाही. त्यामुळे ज्यांनी हे केले, त्यांनी लक्षात ठेवावे, तुमच्याकडे माझा सातबारा असेल तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे. स्वतःच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने अशी निर्मिती सुरू आहे. परंतू, असे करून निवडणूक जिंकता येत नाही. आता तुम्हाला लोकांनीच घरी पाठवायचे ठरविले असल्याचा टोला आमदार बाबर यांनी विटा पालिकेच्या सत्ताधारी गटाला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in