चालीसा म्हणायला तुमचं घर कमी पडतंय का... अजित पवार

अजित पवार Ajit Pawar म्हणाले, त्या रवी राणा Ravi Rana आणि नवनीत राणांना Navneet Rana राष्ट्रवादी काँग्रेसनेच NCP मागील लोकसभा Loksabha व विधानसभा Vidhansabha निवडणुकीसाठी Election पुरस्कृत केलं होतं. ते निवडूनही आले.
चालीसा म्हणायला तुमचं घर कमी पडतंय का... अजित पवार
Ajit Pawarsarkarnama

सोलापूर : ''रवी राणा आणि नवनीत राणा यांना मागच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेच पुरस्कृत केलं होतं. त्यामुळे ते निवडून आले. आता ते हनुमान चालिसाचा मुद्दा घेऊन निघाले आहेत. हनुमान चालीसा म्हणायला मातोश्रीसमोर कशाला जाता. तुमचे घर तुम्हाला कमी पडायला लागले का,'' असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

सोलापूर जिल्ह्यात अनगर नगरपंचायतीच्या स्थापनेनिमित्त कृतज्ञता व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, आपण दोन तारखेला गुढी पाडवा साजरा केला, रमजानच्या मुस्लिम बांधवांना आपण शुभेच्छा देतोय. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती, बसवेश्वर जयंती साजरी केली. सगळं नीट चालू असताना भोंगा आणि हनुमान चालीसाचा विषय काढला आहे. काही कारण आहे का.

Ajit Pawar
नवनीत-रवी राणा यांचं लग्न कसं जमलं, त्यांची लव्ह स्टोरी कशी आहे? हे आपण जाणून घेऊ

अजित पवार म्हणाले, त्या रवी राणा आणि नवनीत राणांना राष्ट्रवादी काँग्रेसनेच मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पुरस्कृत केलं होतं. ते निवडूनही आले. तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायला तुमचं घर कमी पडत होत का, असा टोला लगावून ते म्हणाले, मातोश्री समोर कशाला जाता. तुमचे घर तुम्हाला कमी पडायला लागले का. आम्हाला हनुमान चालीसा म्हणायचा असेल तर आम्ही आमच्या घरात म्हणेन. सर्वोच्च न्यायालयाने सकाळी सहा ते रात्री दहा लाऊडस्पीकरला परवानगी दिली आहे.

Ajit Pawar
Video: हनुमान चालीसा म्हण्याचा आणि राजकारणाचा काय संबंध ?; विद्या चव्हाण

उद्या जर कुठलाही निर्णय घ्यायचा झालंच तर फक्त मस्जिदवरचे भोंगे बंद होणार नाहीत.तर प्रवचन, कीर्तन, हरिनाम सप्ताह असतो, साईबाबांची आरती असते, वाघ्या मुरलीचे कार्यक्रम चालु असतात, नियम लावायला गेला तर त्यावरही या निर्णयाचा परिणाम होईल. मथुरेला लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतलाय, असे उदाहरण देऊन अजित पवार म्हणाले, सर्वांच्या संमत्तीने निर्णय होत असतील तर नको ती भूमिका घेण्याचे कारण काय. आता जे नेते सांगत आहेत, त्यांचे काय खरे आहे का.

Ajit Pawar
शिल्लक ऊसावर तोडगा; कारखान्यांना टनाला दोनशे रूपये रिकव्हरी लॉस देणार...अजित पवार

आता कोणत्याच निवडणुका नाहीत. काय चमत्कार झालाय कोणास ठाऊक आता ते भाजपला पाठींबा आणि आम्हाला विरोध करत आहेत. जनतेला जे पाहिजे ते सर्वांना देण्याची आमची तयारी आहे. पण, ज्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार आहे, जाती धर्मात तेढ निर्माण होणार आहे, त्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत. या प्रश्नावर आम्ही सर्व राजकिय पक्षांची बैठक बोलावली होती. पण मनसे सोडले तर सगळ्यांनी हे सर्व होतय ते बरोबर नाही, असे सांगितले होते.

Ajit Pawar
चालीसा कुठंही म्हणू लागलात तर, संकटमोचन तुमच्या मागे लागेल...धनंजय मुंडे

स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या बँका आणि कारखाने नीट चालवा. प्रत्येक ठिकाणी शरद पवार व अजित पवार येणार नाहीत. मीं माझे कारखाने आणि बँका चांगल्या पद्धतीने चालवतोय. मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहोत. ज्यांना 14 आमदार, नाशिक महापालिका टिकवता अली नाही अशी व्यक्ती शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये वातावरण गढूळ करण्याचं काम करतायत. ज्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे ते त्यांनाच राहिलं. पण, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देता येईल. ते देण्याचा काम आम्ही करणारं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.