इकडे-तिकडे दौरे करण्यापेक्षा मंत्रिमंडळ विस्तार करा... संभाजीराजेंचा सल्ला

आम्ही स्वराज्य संघटना Swaraj Sanghtna स्थापन केलेली आहे. त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर maharashtra कशी होईल, याकडे अधिक लक्ष देणार आहोत.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapatisarkarnama

कोल्हापूर : नवीन मुख्यमंत्री आहेत त्यांना वेळ द्यायला हवा. मंत्रिमंडळ विस्तारासाठी मविआने 30 दिवस तर नव्या सरकारने अजून काही दिवस घेतलेत. त्यामुळे आता वेळ न घालवता इकडे तिकडे दौरे करण्यापेक्षा मंत्रिमंडळ स्थापन करून महाराष्ट्राला न्याय देण्याचे व जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने करावा, अशी अपेक्षा कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूरात त्यांनी आज विविध विषयावर भाष्य केले. यामध्ये त्यांनी नवीन सरकारला मराठा आरक्षण, मंत्रिमंडळ विस्तारावरून काही सल्लेही दिले आहेत. मराठा आरक्षणावर बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा आरक्षण देणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले होते. त्यावेळी मी त्यांच्याकडे ज्या पाच ते सहा मागण्या मान्य केल्या होत्या. त्या त्यांनी पूर्ण करून घ्याव्यात.

Sambhajiraje Chhatrapati
Beed : संभाजीराजे छत्रपतींची चाढ्यावर मुठ अन् हातात चटणी भाकर..

नव्या सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर ते म्हणाले, नवीन मुख्यमंत्री आहेत, त्यांना वेळ द्यायला हवा. पण एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन करावे. कारण त्यांच्यासोबत अनुभवी असे फडणवीस आहेत. राज्याला सध्या मंत्रिमंडळ स्थापन करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीने 30 दिवसांत मंत्रिमंडळ स्थापन केले होते. यांनी अजून काही दिवस घेतलेत. त्यामुळे आता इकडे तिकडे दौरे करण्यापेक्षा मंत्रिमंडळ स्थापन करून महाराष्ट्राला न्याय देण्याचे व जनतेचे प्रश्न सोडवावे, असा सल्ला त्यांनी दिला.

Sambhajiraje Chhatrapati
'संभाजीराजे अन्‌ शिवसेनेतील हा विषय; इतरांनी त्यात चोमडेपणा करू नये'

शिवसेनेतील फुटीवर भाष्य करण्याचे टाळत संभाजीराजे म्हणाले, हा विषय शिवसेनेचा अंतर्गत आहे. त्याविषययी मी भाष्य करणे उचित नाही. ते त्यांचे ते बघतील. आम्ही स्वराज्य संघटना स्थापन केलेली आहे. त्याची व्यप्ती महाराष्ट्रभर कशी होईल, याकडे अधिक लक्ष देणार आहोत. मराठा आरक्षणाविषयी ते म्हणाले, ईबीसी सवलतीबाबत कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास केला. माझी जी मागणी होती की विशेष बाब म्हणून मुलांना नियुक्ती द्यावी.

Sambhajiraje Chhatrapati
धनखड उपराष्ट्रपती झाल्यास मुख्तार अब्बास नक्वी होणार पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल?

मी उपोषणावेळी हीच मागणी केली होती. ह्या मागण्या मागील सरकार ने मान्य केल्या होत्या त्यावेळी मंत्रीमहोदय जाग्यावर आलेले होते. कोर्टाच्या निकालापालिकडे काय आहे हे त्यावेळी बोललो, मुलांना विशेष बाब म्हणून नियुक्त्या देऊन टाकाव्यात. केवळ कोविडमुळे त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत. कोर्टाचा अवमान होईल, असे सांगत आहेत.

Sambhajiraje Chhatrapati
Kolhapur : मंत्रिमंडळ विस्तारासाठी विरोधकांना मोर्चे काढावे लागतील... सतेज पाटील

औरंगाबादच्या नामकरणाविषयी विचारले असा ते म्हणाले, संभाजीनगर नामकरण हा योग्य निर्णय आहे. यापूर्वीच ते व्हायला हवे होते. पण का होत नाही. लोकांना माहिती होणे गरजेचे की हा राज्याचा अधिकार की केंद्राचा अधिकार. साधे कोल्हापूर विमानतळाचा नामकरण राजर्षी राजाराम महाराज व्हावे, म्हणून राज्याचा ठराव केलेला पण अजून का होत नाही. त्यांनी आता लोकांना फसवण्यापेक्षा जे करायचे ते नामकरण करावे.

Sambhajiraje Chhatrapati
दोन राजेंना सत्तेबाहेर करण्याचा शिंदेंचे निर्धार : 'सातारा शहर महाविकास आघाडी' मैदानात

राज्यपालांनी अशी वक्तव्ये टाळावीत....

ज्यपालांच्या वक्तव्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र सर्वांचा आहे. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचा असून येथे सर्वाना राहण्याचा अधिकार आहे. अशी वक्तव्ये करण्यापेक्षा विकासावर भर देणे गरजेचे. राज्यपाल हे राज्याचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते. ज्याने महाराष्ट्राची सामाजिक रचना बिघडेल, त्यांनी अशी वक्तव्ये त्यांनी टाळावीत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in