Hasan Mushrif News: हसन मुश्रीफांविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल

आमदार हसन मुश्रीफ यांनी उभारलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. बेलेवाडी (का) या कारखान्याचे सभासद हाोण्याकरिता आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये दिले आहेत.
Hasan Mushrif, Farmers Complaints
Hasan Mushrif, Farmers Complaintssarkarnama

-संभाजी थोरात

Kolhapur News : सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद व शेअर्स प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार आणखी 25 शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे डीवायएसपी श्रीकांत पिंगळे यांच्याकडे दाखल केली आहे. याआधी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात याच प्रकारची तक्रार कागलचे विवेक कुलकर्णी व इतर शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे.

तक्रारीत शेतकऱ्यांनी म्हटले की, आमदार हसन मुश्रीफ यांनी उभारलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. बेलेवाडी (का) या कारखान्याचे सभासद हाोण्याकरिता म्हणून आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये दिले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आमदार हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबातील लोकांचा व काही एलएलपी कंपनीच्या मालकीचा आहे. यामध्ये अन्य कोणीही सभासद केलेले नाहीत.

शेतकऱ्यांकडून केवळ पैसे जमा केलेले आहेत. याबाबतचा गुन्हा मुरगुड पोलिसांमध्ये त्यांच्याविरोधात दाखल झाला आहे. त्यामध्ये आमचे देखील आमदार मुश्रीफ यांनी सदर कारखान्यांमध्ये सभासद करून घेतो, असे सांगून दहा हजार रुपये घेतले असून शेअर्स दिलेले नाहीत तसेच सभासदही केलेले नाही. यामध्ये त्यांनी आमची फसवणूक केली आहे.

Hasan Mushrif, Farmers Complaints
Hasan Mushrif News: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ पुन्हा ED च्या रडारवर ; चौकशीसाठी उद्या..

आमच्या या तक्रारीच्या अनुषंगाने सदर गुन्हा रजिस्टर नंबर 30/2023 मध्ये सामील करून घ्यावे. आमचा विस्तृत जबाब पोलिसांनी नोंदवून घ्यावा, असे निवेदन शिवाजी जाधव कागल व प्रकाश डावरे गलगले यांनी पंचवीस शेतकऱ्याच्या वतीने आज पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com