वाढलेल्या महागाईबाबत केंद्र सरकारची पोलखोल करा... जयंत पाटील

सांगली Sangali जिल्ह्यातील District खानापूर-आटपाडी Khanapur Atpadi विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी घेतला.
वाढलेल्या महागाईबाबत केंद्र सरकारची पोलखोल करा... जयंत पाटील
Jayant Patilsarkarnama

सांगली : ''प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. प्रत्यक्षात पटवून देत नाही तोपर्यंत लोकं मान्य करत नाही. त्यामुळे आपण लोकांशी बोला... आज महागाई इतकी वाढली आहे, याबाबत लोकांना सांगा.. केंद्रसरकारची पोलखोल करा... या जगात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही. हे डोक्यात ठेवून कामाला लागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठी करा,'' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खानापूर येथे केले.

सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. आपल्याला कोणत्याही निवडणुकीसाठी आपले सैन्य तयार ठेवले पाहिजे. त्यासाठी बुथ कमिट्यांवर भर द्या. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा. त्यांच्या सतत संपर्कात रहा, आपला संपर्क कसा आहे, यावर यश असते, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, आपली संघटना विचारधारेवर आधारीत पाहिजे. विचारधारेचा कार्यकर्ता पक्षासाठी निष्ठेने काम करतो.

Jayant Patil
सातारा-जावळीत 'राष्ट्रवादी'चाच आमदार झाला पाहिजे....जयंत पाटील

''जलसंपदा विभागाची जबाबदारी आपल्याला मिळाली आहे. या संधीचा उपयोग करून पाण्यापासून सांगली जिल्ह्यातील कोणतेही गाव वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करू,'' असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले. यावेळी आमदार अरुण लाड, आमदार सुमनताई पाटील, अविनाश पाटील, सदाशिव पाटील, बाबासाहेब मुळीक, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवा नेते प्रतिक पाटील, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, बाळासाहेब पाटील, विनायक अण्णा, वैभव पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Jayant Patil
शशीकांत शिंदे म्हणतात, मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय...

तसेच युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, युवती जिल्हाध्यक्षा पुजा लाड, प्रतिभा पाटील, अरुण आजबे, हणमंतराव देशमुख, किसन जानकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष निलेश पवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष करण पवार, लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. कुमार शेडबाळे, खानापूर युवक तालुकाध्यक्ष हर्षवर्धन बागल, आटपाडी युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील, खानापूरच्या महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा पाटील, आटपाडीच्या तालुकाध्यक्षा अश्विनी कासार, विटा शहराध्यक्षा लता मेटकरी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.