बंडखोरांकडून गलिच्छ राजकारण.. आईचे दूध विकण्याचे पाप केलं... संजय पवार

भाजपने BJP यांना पावडर लावून पहिल्या बेंचवर First Bench बसविले आहे. उद्या हेच सर्वजण शेवटच्या बेंचवर Last Bench बसलेले दिसतील. त्यावेळी त्यांना उद्धव साहेबांची Udhav Thackeray आठवण येईल.
Sanjay Pawar
Sanjay Pawarsarkarnama

कोल्हापूर : उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना भाजपचे ऐकूण या सर्वांनी बंडखोरी करत गलिच्छ राजकारण केलं आहे. या सर्वांना महाराष्ट्रच नव्हे तर देशही माफ करणार नाही. कारण त्यांनी आईचे दुध विकण्याचे पाप केलं आहे, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी बंडखोर आमदारांवर केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, उद्धव साहेबांची मुलाखत पाहून सर्व केवळ शिवसैनिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनत हळहळी आहे. कशापद्धतीने स्वच्छ व सरळ माणसांचा या लोकांनी घात केला आहे.पोटात एक आणि ओठात एक असे ठाकरे कुटुंबांनी कधीही केलेले नाही. एकदा गोळी सुटली की माघार नाही, अशी त्यांची भूमिका होती.

Sanjay Pawar
शिवसेनेची स्थिती पाहून संजय पवार ढसाढसा रडले : म्हणाले, असे पोपट परत घेऊ नका

ज्या मुलांना आई, वडीलांसारखे या मातोश्रीने प्रेम दिले. फाटक्या, तुटक्या, गंजलेले शिवसैनिकाला आमदार, खासदार, मंत्री केलं. मान, सन्मान केला. त्यातून ही सगळी मंडळी गलेलट्ठ झाली. पण, या सर्वांनी उद्धव साहेब आजारी असताना शडयंत्र केले. केवळ भाजपचे एकुण त्यांनी गलिच्छ, घाणेरडे राजकारण केलं. त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा देश त्यांना माफ करणार नाही.

Sanjay Pawar
एकनाथ खडसे नागरिकांच्या प्रश्नावर कडाडले!

उद्धव साहेबांची खंत खरीत आहेत. उद्धवसाहेब आजारी होते, त्यावेळी आम्ही शिवसैनिकांनी प्रत्येक ठिकाणी मंदीरात जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना केली. शिवसेनेने हिंदू, मराठ्यांना न्याय देण्याचे काम केलं. आज त्यांच शिवसेनेच्या पक्ष प्रमुखाविरोधात या बंडखोरांनी षडयंत्र रचले, त्याबद्दल राग व्यक्त होत आहे. स्वतः च्या आईचे दुध विकण्याचे पाप या माणसांनी केलं आहे. त्यामुळे त्यांना कोणीही माफ करणार नाही. शिवसेना संपण्याने संपत नाही.

Sanjay Pawar
खरी शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले

शिवसेना संपविणारे संपलेत. हे सुध्दा थोड्या दिवसांत संपतील. यांना भाजपने पावडर लावून पहिल्या बेंचवर बसविले आहे. उद्या हेच सर्वजण शेवटच्या बेंचवर बसलेले दिसतील. त्यावेळी त्यांना उद्धव साहेबांची आठवण येईल. काँग्रेसने, राष्ट्रवादीने फसविले. पण, घरातील लोकांनी फसविणे योग्य नाही.

Sanjay Pawar
शिवसेना फलकावरून बंडखोर शेवाळेंचे नाव हटवले; शाखाप्रमुखांना हल्ल्याची धमकी

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या हातात तलवार व पाठीवर ढाल असायची. कारण त्यांच्यावर पुढून वार कोणीही करणार नव्हते. पण, कोणी पाठीवर वार करेल म्हणून ढाल पाठीवर ठेवली जायची. त्याद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या ही पाठीवर वार झाला आहे. राजकिय पाठबळ नसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना साहेबांनी मोठे केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com