सिंधुदुर्गात राष्ट्रवादीला राणेंचा धक्का : जिल्हा बॅंकेचे संचालक चव्हाण भाजपत 

आगामी काळात होऊ घातलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का दिला आहे. जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
Director of Sindhudurg District Bank Gulabrao Chavan joins BJP
Director of Sindhudurg District Bank Gulabrao Chavan joins BJP

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : आगामी काळात होऊ घातलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का दिला आहे. जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात गुलाबराव चव्हाण यांचे नाव मोठे आहे. नारायण राणे यांच्या मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी विधान सभेतील विरोधी पक्षनेते फडणवीस, खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

या वेळी आमदार नीतेश राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, आमदार रमेश पाटील, प्रदेश सचिव प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अशोक सावंत, दिलीप रावराणे, संजय चव्हाण, राजू राऊळ, सुदेश आचरेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, अजिंक्‍य पाताडे, राजू परुळेकर, बाबा परब आदी उपस्थित होते. 

सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्यापासून गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहेत. तेव्हापासूनच ते जिल्हा बॅंकेच्या संचालक पदावरही काम करीत आहेत. जिल्हा बॅंकेच्या सत्तेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 
 
हेही वाचा : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी गृहखाते गंभीर नाही 
ठाणे : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी राज्याचे गृहखाते गंभीर आहे. मात्र, महाराष्ट्रातील एका मराठी आर्किटेक्‍टच्या मृत्यूच्या तपासाबाबत गृहखाते गंभीर नसल्याने या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी थेट मंत्रालयासमोर सत्याग्रह करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. 

दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक यांनी या सत्याग्रहासाठी परवानगी मिळावी; म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयासहित दुपारी बारा वाजता मंत्रालया समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, असे आवाहन सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केले आहे. तसेच, या विषयात मुख्यमंत्री यांनी स्वत: लक्ष घालून अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. 

मुंबईतील मराठी आर्किटेक्‍ट अन्वय नाईक यांचा पाच मे 2018 रोजी अलिबाग येथे राहत्या घरी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पत्नीने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अन्वय नाईक यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोट पोलिसांना प्राप्त झाल्याने या गुन्ह्यासंदर्भात ती सुसाईड नोट पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली होती. परंतु या प्रकरणाचा तपास तत्कालीन सरकारमधील बड्या नेत्यांच्या दबावामुळे योग्य प्रकारे होऊ शकला नसल्याचा आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com