तासाभरात शेतावर या, अन्यथा मिरवणूकच काढतो : नीतेश राणेंची दमबाजी

पंचनाम्यासाठी केलेला फोन झाला व्हायरल...
तासाभरात शेतावर या, अन्यथा मिरवणूकच काढतो : नीतेश राणेंची दमबाजी
nitesh rane.jpg

कणकवली ः एका तासाच्या आता लिंगडाळ येथील शेतावर या अन्यथा तुमची मिरवणूक काढूनच इथे आणतो अशा शब्दात आमदार नीतेश राणे यांनी कृषी अधिकार्‍यांना झापले. राणेंचा हा धमकीचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आमदार नीतेश राणे यांनी लिंगडाळ (ता.देवगड) या गावात जाऊन भातपीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी येथील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी तसेच महसूलचा एकही अधिकारी, कर्मचारी फिरकला नसल्याची बाब तेथील ग्रामस्थांनी राणेंच्या निदर्शनास आणून दिली. तर राणेंनीही तातडीने मोबाईलवरून कृषी अधिकार्‍यांना झापले.

आमदार नीतेश राणे देवगड दौर्‍यावर असताना पालकमंत्रीही सिंधुदुर्गात आले होते. त्यांनी भातपीक नुकसानीबाबत कृषी, महसूल अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली होती. त्यासाठी सर्वच तालुक्यातील कृषी अधिकारी ओरोसला येथे गेले होते. ही बाब कृषी अधिकार्‍यांनी आमदार नीतेश राणेंना सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी राणे यांनी, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे अमिताभ बच्चन आहे का, त्याला बघायला जाताय? असे सांगत पुन्हा फटकारले. एवढेच नव्हे तर पुढील एक तासात कृषी अधिकारी लिंगडाळ गावात न आल्यास त्यांची मिरवणूक काढण्याची धमकीही त्यांनी दिली. हा सारा प्रकार काहींनी मोबाईल कॅमेर्‍यात चित्रित केला. तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in