ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले, मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही तर...! 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी एकाच दिवशी पुरग्रस्त दौरा झाला.
CM Uddhav Thackeray inspected the Flood situation in Kolhapur
CM Uddhav Thackeray inspected the Flood situation in Kolhapur

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी एकाच दिवशी पुरग्रस्त दौरा झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांना टोला लगावला. त्यांचे नाव न घेता ठाकरे यांनी आपण पॅकेज घोषित करणारे नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे म्हटलं. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray inspected the Flood situation in Kolhapur)

पुरस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पाणी अजूनही ओसरलेले नाही. पुरबाधित क्षेत्र म्हणून रेड आणि ब्लू झोन तयार केले असले तरीही लोकांच्या जिवावर बेतणाऱ्या अशा झोनमध्ये आता बांधकामांना परवानगी देण्याबाबत विचार केला जाईल. अशा झोनमध्ये अतिक्रमण झाले आहे. सरकार अशी बांधकामे आणि नाहक जीव गमावणाऱ्यांकडे पाहू शकत नाही. नागरिकांचे पुनर्वसन केले पाहिजे. भविष्यातील पूर रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले जातील. 

पूर रोखण्यासाठी भिंत बांधायची की नाही, यावरही मतमतांतरे असतील तर आपण पुढेच सरकू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी समित्या नेमल्या जातात; त्यांच्या अहवालांचा विचार होणार नसेल तर त्या नेमण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे त्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे पहिल्यांदा निवडले पाहिजेत. ते लोकांसमोर यायला हवेत. ज्या कामांसाठी या लोकांची मदत घेतली आहे, ती कामे व्हायला हवीत, असे ठाकरे यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गावांच्या पुनर्वसनासाठी मोठा आराखडा तयार करायला हवा. येत्या काही वर्षांमध्ये पुनर्वसन करावे लागणार आहे. कठोर निर्णय घेतल्यास नागरिकांनी त्यामागे ठामपणे उभे राहावे. पूरस्थितीपूर्वी कर्नाटकशी सतत संपर्कात राहिल्याने पाणी कमी झाले. झोनमध्ये होणाऱ्या अतिक्रमणांसाठी आता कठोर कायद्यांची गरज आहे. पुर येणाऱ्या नद्यांमधील पाणी दुष्काळी भागांकडे वळविण्याचा विचार करावा लागेल. पूरग्रस्तांना मदतीसाठी नवे निकष तयार करावे लागतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com