ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचीच चौकशी समिती : चंद्रकांत पाटलांचा कोल्हापूर झेडपीवर रोख - chandrakant patil targets Kolhapur zp for corruption in corona period | Politics Marathi News - Sarkarnama

ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचीच चौकशी समिती : चंद्रकांत पाटलांचा कोल्हापूर झेडपीवर रोख

निवास चौगले
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

ल्हापूर जिल्हा आता राज्यात हॉटस्पॉट झाला आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये मात्र कोरोना साहित्य खरेदीमध्ये हजारो नव्हे तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे. 

कोल्हापूर : बाजारात 33 रुपयांना मिळणारा एन 95 मास्क 190 रुपयांना खरेदी केला आहे. याशिवाय, थर्मल स्कॅनर, पीपीई किट, व्हिटीएम किटस उत्पादन खर्च, बाजार मुल्यापेक्षा जास्त किंमतीने खरेदी केली आहेत. यावर जिल्ह्याधिकारी दौलत देसाई यांनीही याची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचीच चौकशी समिती म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेबाहेरील उच्चस्तरीय समितीकडून यामध्ये सामिल असणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करुन गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पाटील यांनी मागणी केली.

कोरोनासाठी घेतलेल्या वैद्यकीय साहित्यांमधील दर तफावतीमध्ये दोषी असणाऱ्या पुरवठादारासह यामध्ये सामिल अधिकारी आणि चौकशी समितीचीही चौकशी व्हावी यासाठी शनिवारी (ता. 12) "दैनिक सकाळ'मधून अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावीच अशा आशयाची वृत्त प्रसिध्द केले होते.

श्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा आता राज्यात हॉटस्पॉट झाला आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये मात्र कोरोना साहित्य खरेदीमध्ये हजारो नव्हे तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यापासून जिल्हा परिषदेने व्हीटीएम किटस, पीपीई किटस, एन. 95 मास्क, थर्मल स्कॅनर यासह 28 वस्तूंची खरेदी केली आहे. यामध्ये बाजारात 33 रुपयेला मिळणारा मास्क जिल्हा परिषदेकडून 190 रुपयेला खरेदी केला आहे. खरेदीसाठी वस्तूंचे उत्पादन मुल्य, बाजार भाव, त्याच्या खरेदीसाठी उपलब्ध दर करार, याचा अभ्यास जिल्हा परिषदेकडून झाला होता की नाही? हाच मुळात मोठा प्रश्‍न आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा पुरवठादार कंपनीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच अधिकाऱ्यांची चौकशी समिती आहे. त्यामुळे सर्वांचीच चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेबाहेरील चौकशी समिती नियुक्ती केली पाहिजे. तरच, ही चौकशी पारदर्शी होणार असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले.

ज्यांनी खरेदी केली तेच चौकशी समितीत असू नयेत. जिल्हा परिषदेबाहेरील समितीची नियुक्ती करुन या सर्वच प्रकरणाची, अधिकारी व पुरवठा दाराचीचौकशी केली पाहिजे, अशी मागणीही श्री पाटील यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख