सदावर्तेंची वकिलीची सनद रद्द करा... मराठा मोर्चाची बार कौन्सिलकडे तक्रार

सनद रद्द न केल्यास मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या Maratha Kranti THok Morcha वतीने राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा धनाजी साखळकर Dhanaji Sakhalkar यांनी दिला आहे.
सदावर्तेंची वकिलीची सनद रद्द करा... मराठा मोर्चाची बार कौन्सिलकडे तक्रार
Maratha Kranti Morchasarkarnama

पंढरपूर :‌ मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात तक्रार करणाऱ्या आणि शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार असलेल्या अॅड. गुणरत्न‌ सदावर्ते व त्यांची पत्नी‌ अॅड. जयश्री पाटील ‌यांची वकिलीची सनद रद्द करावी, अशी मागणी मराठा ठोक क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांनी न्यायालयात तक्रार केली होती. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक यानिवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार ही तोच असल्याची तक्रार आहे. यावरून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आता आक्रमक झालेले आहेत. यासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी तर महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे लेखी तक्रार करत सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

Maratha Kranti Morcha
गुणरत्न सदावर्ते तुरुंगात; एसटी कर्मचारी कामावर

या तक्रारीनंतर सदावर्ते यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत.सदावर्ते यांनी एसटी आंदोलना दरम्यान, वकिली व्यवसायाचा दुरोपयोग करून कामगारांकडून पैसे उखळल्याचाही तक्रार केली आहे. सनद रद्द न केल्यास मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा धनाजी साखळकर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.