कोरोना इफेक्ट : कोल्हापूरचा शाही दसरा या वर्षी रद्द  - administration cancels Dushhehara Celebration due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना इफेक्ट : कोल्हापूरचा शाही दसरा या वर्षी रद्द 

सुनील पाटील
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

सोने लुटण्याचा कार्यक्रम रद्द 

कोल्हापूर : आकाशात कडाडणारी वीज असो, वादळी वारा किंवा मुसळधार पाऊस असो प्रत्येक वर्षी ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी कोरोना संसर्ग वाढू नये, लोकांनी साधेपणानेच हा सण साजरा करावा यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी यंदाचा शाही दसरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते. सध्या याचे प्रमाण कमी आहे. मात्र, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सार्वजनिक सण व समारंभ रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग, सीपीआरसह इतर शासकीय विभाग प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेला यंदाचा दसरा रद्द करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. दसरा चौकात होत असलेल्या शाही दसऱ्याला लाखो लोक उपस्थित राहून सोने लुटत होती. यावर्षी मात्र सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार नाही. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षीचा शाही दसरा रद्द करण्यात आला आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या सूचनेनुसार दसरा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 
जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख