kolhapur zp | Sarkarnama

सभापती पदांची संख्या वाढणे अशक्‍य 

सरकारनामा न्यूजब्युरो 
बुधवार, 29 मार्च 2017

कोल्हापुरात जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेताना भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठिंबा दिलेल्या सदस्यांना पदांचे गाजर दाखवले आहे. त्यासाठी पदांची संख्या वाढवण्याचे विधान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले असले तरी सद्यःस्थिती सभापती पदांची संख्या वाढणे अशक्‍य आहे. 

कोल्हापूर : कोल्हापुरात जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेताना भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठिंबा दिलेल्या सदस्यांना पदांचे गाजर दाखवले आहे. त्यासाठी पदांची संख्या वाढवण्याचे विधान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले असले तरी सद्यःस्थिती सभापती पदांची संख्या वाढणे अशक्‍य आहे. 

कोल्हापुरात जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. यासाठी त्यांना जनसुराज्यसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेनेच्या सात, आवाडे, आमदार सत्यजित पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह एका अपक्ष सदस्यांनी पाठिंबा दिला. या पाठिंब्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येकाला सभापती पद देण्याचा शब्द पालकमंत्री पाटील यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर यासाठी सद्या असलेल्या सभापती पदांची फोड करून ती दुप्पट करण्यात येतील असेही सांगितले. 

जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षांव्यतिरिक्त चार सभापती पदे आहेत. त्यात बांधकाम व आरोग्य, शिक्षण व अर्थ, समाजकल्याण व महिला व बालकल्याण अशी पदे आहेत. या चारही पदाच्या निवडीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाला आहे. पदे वाढवायची झाल्यास त्याची अधिसूचना वेगळी काढावी लागली असती पण ते झालेले
नाही. याशिवाय ही पदे वाढवायची म्हटल्यास त्यासाठी स्वतंत्र कक्ष, स्वीय्य सहाय्यक, शिपाई, वाहन यासारख्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय केवळ कोल्हापुरपुरता घेता येणार नाही. संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल.

विधानसभेत हा कायदा मंजूर झाला तरी तो विधानपरिषदेत भाजपचे बहुमत नसल्याने मंजूर होणार नाही. दुसरीकडे सद्या अस्तित्वात असलेल्या पदांच्या निवडीचा कार्यक्रम 3 एप्रिल रोजी जाहीरही झालेला आहे. अशा परिस्थितीत पदे वाढवून सर्वांना ती देण्याचे शब्द म्हणजे "गाजर' च असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख