आमचं ठरलंय...नोकऱ्या देणारच : ऋतुराज पाटील यांचा 'अॅक्शन प्लॅन'!

सध्या जागतिक मंदी, बेरोजगारी याची जोरात चर्चा आहे. यावरुन आरोप प्रत्यारोपही होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे युवा उमेदवार ऋतुराज पाटील यांनी 'मिशन रोजगार' हा अजेंडा हाती घेतला आहे. 'आमचं ठरलंय नोकऱ्या देणारच' असे सांगत त्यांनी याचा 'अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे.
Kolhapur South Congress NCP Candidate Ruturaj Patil Agenda
Kolhapur South Congress NCP Candidate Ruturaj Patil Agenda

कोल्हापूर : सध्या जागतिक मंदी, बेरोजगारी याची जोरात चर्चा आहे. यावरुन आरोप प्रत्यारोपही होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे युवा उमेदवार ऋतुराज पाटील यांनी 'मिशन रोजगार' हा अजेंडा हाती घेतला आहे. 'आमचं ठरलंय नोकऱ्या देणारच' असे सांगत त्यांनी याचा 'अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. 

सध्याच्या तरुणाईसमोर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो बेरोजगारीचा आहे आणि हा आपल्या देशाचा सगळ्यात मोठा सामाजिक प्रश्न होऊ पाहत आहे. सरकारच्याच सप्टेंबर २०१८ च्या सर्वेक्षणानुसारआपल्या देशात ३ कोटी १० लाख सुशिक्षित बेरोजगार आहेत. नॅशनल सँपल सर्व्हे च्या रिपोर्ट नुसार गेल्या ४५ वर्षातील ही सर्वात जास्त बेरोजगारी आहे.  सध्या निवडणुकीचे दिवस आहेत, लोक वेगवेगळी आश्वासने देत आहेत, जाहीरनामे मांडत आहेत, त्यातच काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी चे  २९ वर्षाचे युवा उमेदवार ऋतुराज पाटील यांनी हा मुद्दा  लक्षात घेऊन 'मिशन रोजगार' हा अजेंडा घेतला आहे. 

त्यासाठीचा कालबद्ध अॅक्शन प्लॅन त्यांनी मांडला आहे. 'आमचं ठरलंय नोकऱ्या देणारच' हा अजेंडा त्यांनी घेतला असून रोजगारावरचा असा अॅक्शन प्लॅन मांडणारे ते कदाचित राज्यातील एकमेव उमेदवार ठरु शकतात. या ऍक्शन प्लॅन मध्ये प्रामुख्याने ९ मुद्यांचा समावेश आहे.   यामध्ये प्रामुख्याने पुण्या मुंबई मधून कोल्हापूरला स्थलांतरीत होणाऱ्या उद्योगांना 'रिव्हर्स मायग्रेशन बेनिफिट' या संकल्पनेतर्गत त्यांना घरफाळा व टॅक्स मध्ये काही विशेष सवलत देता येईल का याबद्दल धोरण राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचा मुद्दा मांडला आहे.

'युथ एनर्जी सोर्सेस' या संकल्पनेखाली रोजगाराची गरज असलेल्या लोकांना 'फिनिशिंग स्कुल" मार्फत छोटे छोटे कोर्सेस उपलब्ध करून देणे, स्किल्स ना अपडेट ठेवण्यासाठी रिसोर्स सेंटर  मार्फत ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून देणे, याचाही विचार यात करण्यात आला आहे. आजकाल पूर्ण वेळ नोकरीची संकल्पना कालबाह्य होत चालली आहे. त्याउलट, गरजेनुसार काही दिवस किंवा काही तास एखाद्या व्यक्तीची सेवा घेणे अशी पद्धत रूढ होत आहे अशी 'फ्रिलान्सिंग' ची कामे मतदार संघात युवा पिढीला मिळावीत, यासाठी वेगवेगळ्या  विषयावरील फ्रिलान्सर क्लब तयार करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात वेगवेगळे वीज दर आहेत. वाढत्या विजदरामुळे कोल्हापुरातील उद्योग कर्नाटकात स्थलांतरीत होत आहेत हे टाळण्यासाठी वीज दरवाढीला सतत विरोध करण्याचा मानस त्यात व्यक्त करण्यात आला आहे. विजेचे दर कमी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करून उद्योग कोल्हापुरात राहतील असे पाहिले जाईल, असे आश्वासन यात देण्यात आले आहे.

 मतदारसंघातील टेम्बलाईवाडी येथे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आय टी पार्क साठी जागा देण्यात आलेली आहे. हा आय. टी. पार्क लवकरात लवकर सुरु होऊन नोकऱ्या मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले असून सध्या असलेल्या आय. टी. पार्क ला सध्या आलेल्या सुविधा चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. कोल्हापूर हे रस्ते, रेल्वे व विमान या तिन्ही मार्गांनी उत्तम प्रकारे कनेक्टेड आहे. त्यामुळे, कोल्ड स्टोरेज, गोडाऊन्स असे शेतीपूरक उद्योग उभे करण्यास प्राधान्य देऊ असेही यात नमूद करण्यात आले आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या रिटेल क्षेत्रात कोल्हापूरच्या युवकांना जास्तीत जास्त संधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ऋतुराज पाटील यांनी दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com