IPL नंतर निंबाळकर कोट घालूनच भेटले; पवारांच्या मुलाखतीत कोल्हापुरच्या आठवणी! 

जागतिक मराठी अकादमीच्यावतीने आयोजित मुलाखतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील अनेक आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मुलाखत घेतली. बहुंताशी प्रश्‍नांची उत्तरे देताना श्री. पवार यांनी त्यांना कोल्हापुरात आलेल्या अनुभावांचाही उहापोह केला.
IPL नंतर निंबाळकर कोट घालूनच भेटले; पवारांच्या मुलाखतीत कोल्हापुरच्या आठवणी! 

कोल्हापूर : जागतिक मराठी अकादमीच्यावतीने आयोजित मुलाखतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील अनेक आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मुलाखत घेतली. बहुंताशी प्रश्‍नांची उत्तरे देताना श्री. पवार यांनी त्यांना कोल्हापुरात आलेल्या अनुभावांचाही उहापोह केला. 

दोन तासांच्या या मुलाखतीत श्री. पवार यांनी समतेचा विचार देशभर पोहचवणाऱ्या शाहू महाराज यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र एकवटला तर तो फक्त शिवाजी महाराजांच्या नावानेच एकवटेल असे श्री. पवार म्हणाले. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारानेच राज्य आणि देशातील जातीभेदाच्या भिंती दूर होतील, असेही त्यांनी नमूद केले. 

जुन्या काळातील क्रिकेट खेळाडुंची अर्थिक परिस्थितीत, त्यांना मिळणारे मानधन यावर बोलताना त्यांनी कोल्हापुरातील विक्रमवीर क्रिकेटपटू कै. भाऊसाहेब निंबाळकर यांची आठवण सांगितली. डॉन ब्रॅडमन यांचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडून पाहणारे कै. निंबाळकर मला भेटले आणि त्यांनी आपल्या हलाखीच्या जीवनाबद्दल सांगताच मी अस्वस्थ झाल्याचे श्री. पवार म्हणाले. त्यावर आयपीएल सुरू झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या निधीतून एक कसोटी खेळलेल्या क्रिकेट खेळाडूला 50 हजार रूपयांची पेन्शन देण्याचा निर्णय मी घेतला, त्यानंतर कोल्हापुरात आल्यानंतर कै. निंबाळकर हे मला कोट घालूनच भेटले असे श्री. पवार यांनी सांगितले, त्यावरून त्यांची परिस्थिती सुधारल्याचे माझ्या ध्यानात आल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. 

एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती नसेल तर ती करून घेण्याची मला सवय आहे. मी देशाचा सरंक्षण मंत्री झालो, त्यावेळी या क्षेत्राबद्दलचे माझे ज्ञान काहीच नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा याच क्षेत्रातून जनरल म्हणून निवृत्त झालेले कोल्हापुरचे एस. पी. एस. थोरात यांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरला आलो, दोन दिवस कोल्हापुरात थांबून त्यांच्याकडून या क्षेत्रातील बारकावे माहिती करून घेतले, त्यांच्यासह या क्षेत्रातील तज्ञांनाही भेटून माहिती करून घेतल्याचे श्री. पवार यांनी श्री. ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

"तुम्ही देव मानता का ? ' या श्री. ठाकरे यांच्या प्रश्‍नावर श्री. पवार म्हणाले,"ज्याठिकाणी हजारो लोक भेट देतात त्या तीर्थक्षेत्राला जायला मलाही आवडते, त्यातून मी पंढरपूरच्या विठोबाचे, तुळजापूरच्या भवानीमातेबरोबरच कोल्हापुरच्या अंबाबाईच्याही दर्शनासाठी जातो. मात्र, त्याचा कधी बागुलबुवा कधी केला नाही. देवामुळे काही होत यावर माझा विश्‍वास नाही.' बुलेट ट्रेनविषयीच्या प्रश्‍नावर उत्तर देताना त्यांनी मुंबई-अहमदाबादऐवजी पुणे, नागपूरसह कोल्हापुरला जोडणारी बुलेट ट्रेन असावी असे सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com