मी महाजन असले तरी संस्कार गोपीनाथ मुंडेंचेच! 

मी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या असले तरी माझ्यावर संस्कार गोपीनाथ मुंडे यांचे झालेत, असे भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मी महाजन असले तरी संस्कार गोपीनाथ मुंडेंचेच! 

कोल्हापूर : मी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या असले तरी माझ्यावर संस्कार गोपीनाथ मुंडे यांचे झालेत, असे भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

दोन दिवसांच्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या महाजन यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार बैठकीच्या ठरलेल्या वेळेपेक्षा त्या अर्ध्या तास उशीरा आल्या, त्याचा संदर्भ घेऊन त्या म्हणाल्या,"मी महाजन असल्याने वेळेवर पत्रकार परिषदेला येईल अशी तुमची अपेक्षा असेल. मी जरी प्रमोद महाजन यांची कन्या असले तरी माझ्यावर मुंडेंचे संस्कार झाले आहेत. मी वडीलानंतर राजकारणात आले. त्यापुर्वी माझा आणि पक्षाचा फारसा संबंध नव्हता. 2006 पासून मी पक्षात सक्रिय झाले. 2014 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले.' 

त्या म्हणाल्या,"2016 मध्ये माझ्यावर युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दिली. देशात युवतींचा वाटा पन्नास टक्के आहे, त्यांची मते जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षभरात देशातील 24 राज्यांचा दौरा केला. युवक, युवतींशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा काय आहेत, सरकारची धोरणे काय असावीत हे त्यांच्याकडून जाणून घेतले.' 

"झेंडा लगाओ, दंडा खाओ' अशी पुर्वी युवा मोर्चाची अवस्था होती. अतिशय संघर्षातून युवा मोर्चाची वाटचाल सुरू होती. आज देशातील 65 टक्के भूभागात भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे आता युवा मोर्चाला चांगले दिवस आले. जानेवारी महिन्यापासून देशातील नव मतदारांना शोधून त्यांच्या नोंदणीचे प्रयत्न सुरू आहेत. युवा मोर्चाची नेहमीच निवडणुकीची तयारी असते, आताच हा दौरा हा त्याचा भाग असला तरी त्यातून सरकारविषयीचे मत जाणून घेणे हेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

अखिल भारतीय विद्याथी परिषद ही भाजपाची नाही, पण त्यांच्याशी आमचा संवाद सुरू असतो. परिषदेतील अनेकजण नंतर युवा मोर्चात आले, पुढे आमदार, खासदारही झाले, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com