kolhapur politics | Sarkarnama

दादा म्हणतात, "बंटी, मुश्रीफ छोट्या मनाचे'! 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 29 मार्च 2017

कॉंग्रेस अंतर्गत नाराजीमुळे जिल्हा परिषदेची सत्ता मिळवल्यानंतर पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे. त्यातून दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकेची एकही संधी ते सोडत नाहीत. सभापती निवडी संदर्भात आयोजित भाजप आघाडीतील घटक पक्षांच्या बैठकीत त्यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना "हे दोन्ही नेते छोट्या मनाचे आहेत' असा टोला लगावला आहे. 

कोल्हापूर : कॉंग्रेस अंतर्गत नाराजीमुळे जिल्हा परिषदेची सत्ता मिळवल्यानंतर पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे. त्यातून दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकेची एकही संधी ते सोडत नाहीत. सभापती निवडी संदर्भात आयोजित भाजप आघाडीतील घटक पक्षांच्या बैठकीत त्यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना "हे दोन्ही नेते छोट्या मनाचे आहेत' असा टोला लगावला आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीत अपयश येऊनही पाटील व मुश्रीफ हे सभापती निवडीत फोडोफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोपही पालकमंत्री पाटील यांनी केला आहे. भाजप आघाडीचे सदस्य एकसंघ असून या दोन नेत्यांचा फोडाफोडीला कदापिही यश येणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

पालकमंत्री पाटील यांनी बोलावलेल्या या बैठकीला चंदगड आघाडीचे दोन सदस्य गैरहजर होते. पदांची संख्या कमी आणि घटक पक्ष जास्त अशी अवस्था झाली आहे. त्यात गटनेता निवडीवरून सत्ता स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून आघाडीत खदखद सुरू आहे. सर्वच घटक पक्षांना पद देण्याचे आश्‍वासन दिले आहे, पण हे शक्‍य नसल्याने ऐनवेळी त्यांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे. आज भाजप आघाडीकडे 37 चे संख्याबळ आहे, ही संख्या 41 पर्यंत जाईल असे श्री. पाटील यांना वाटते. प्रत्यक्षात काय होणार यासाठी 3 एप्रिलची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख