कोल्हापुरात जिल्ह्यात हुंदडणाऱ्यांची साडेतीनशे वाहने जप्त; संचारबंदी संपल्यानंतर परत देणार - Kolhapur Police Confiscated Vehicles in Curfew | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापुरात जिल्ह्यात हुंदडणाऱ्यांची साडेतीनशे वाहने जप्त; संचारबंदी संपल्यानंतर परत देणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 मार्च 2020

अत्यावश्‍यक सेवेचा बहाणा करीत चकवा देणाऱ्या 358 जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली. संचारबंदीत हुंदडणाऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी कारवाईची वेळ पोलिसांवर आली. जिल्ह्यातील 358 पैकी शहरात 107, तर इचलकरंजीत 72 वाहने जप्त केली

कोल्हापूर : अत्यावश्‍यक सेवेचा बहाणा करीत चकवा देणाऱ्या 358 जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली. संचारबंदीत हुंदडणाऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी कारवाईची वेळ पोलिसांवर आली. जिल्ह्यातील 358 पैकी शहरात 107, तर इचलकरंजीत 72 वाहने जप्त केली.

संचारबंदीत घरी बसा, असा वारंवार संदेश देऊनही या ना त्या कारणास्तव हुंदडणाऱ्यांना पोलिसांना दणका द्यावा लागला. अत्यावश्‍यक सेवांचे कारण सांगून फिरणाऱ्यांची शहानिशा केली; तेव्हा विनाकारण फिरणाऱ्यांची माहिती पुढे आली. पोलिसांनी अशांकडील वाहने जप्त करून दंडात्मक कारवाईची प्रक्रिया केली. जप्त वाहने संचारबंदी संपल्यानंतरच टप्प्याटप्प्याने वाहनधारकांना दिली जाणार आहेत. 

शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक वसंत बाबर तसेच इचलकरंजीसह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. दरम्यान, बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील एका धाब्याच्या पाठीमागे बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या तरुणास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 35 बाटल्या जप्त केल्या आहेत. अभिजित पांडुरंग ठाणेकर (वय 30, रा. झुलपेवाडी, ता. आजरा, सध्या रा. नावली, ता. पन्हाळा) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

जप्त वाहने

जप्त केलेल्या वाहनांची पोलिस ठाण्यांनुसार संख्या ः जुना राजवाडा : 4, लक्ष्मीपुरी : 7, शाहूपुरी : 5, राजारामपुरी : 7, करवीर : 17, कागल : 5, मुरगूड : 20, गांधीनगर : 10, गोकुळ शिरगाव : 14, इस्पुर्ली : 3, राधानगरी : 2, हातकणंगले : 6, भुदरगड : 56, गडहिंग्लज : 11.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख