आमदार मुश्रीफांनी मारली देवळाच्या कट्ट्यावरच बैठक.

कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक हे गाव. काल दुपारी दोनच्या सुमाराला पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ या गावात आले होते. गाडीतून उतरताच त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. एवढ्यातच पूरग्रस्तांबरोबरच ग्रामस्थही मंदिरातच गोळा झाले. त्यामुळे आमदार मुश्रीफ यांनी ही गावकऱ्यांबरोबर मंदिराच्या कट्टयावरच ठिय्या मारला.
आमदार मुश्रीफांनी मारली देवळाच्या कट्ट्यावरच बैठक.

मुरगूड  : कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक हे गाव. काल दुपारी दोनच्या सुमाराला पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ या गावात आले होते. गाडीतून उतरताच त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. एवढ्यातच पूरग्रस्तांबरोबरच ग्रामस्थही मंदिरातच गोळा झाले. त्यामुळे आमदार मुश्रीफ यांनी ही गावकऱ्यांबरोबर मंदिराच्या कट्टयावरच ठिय्या मारला. 

त्याचवेळी त्यांना बसण्यासाठी खुर्ची घेऊन लगबगीने येणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी आवर्जून सांगितले, ''अरे.....खुर्ची नको. मला देवासमोर देवळाच्या कट्टयावरच बसायचे आहे''. मग त्यांनी गावकऱ्यांसोबत कट्ट्यावर बसूनच चहाही प्यायला. गावकामगार तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक तसेच ग्रामस्थांसोबत महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन ते पुराने बाधित झालेल्या शेतीची व पुराने पडझड झालेल्या घरांची पाहणी करण्यासाठी पुढे निघून गेले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com