"गोकुळ'च्या शॉपितील अपहारप्रकरणी अमित पवारविरुद्ध गुन्हा दाखल 

जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शॉपीत झालेल्या 63 लाख रूपयांच्या अपहारप्रकरणी शॉपी इनचार्ज अमित अशोकराव पवार (रा. नवीन वाशी नाका, मूळ गांव-राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संघाचे वरिष्ठ लेखाधिकारी सदाशिवराव श्रीपती पाटील (रा. हिरवडे खालसा) यांनी फिर्याद दिली आहे.
"गोकुळ'च्या शॉपितील अपहारप्रकरणी अमित पवारविरुद्ध गुन्हा दाखल 

कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शॉपीत झालेल्या 63 लाख रूपयांच्या अपहारप्रकरणी शॉपी इनचार्ज अमित अशोकराव पवार (रा. नवीन वाशी नाका, मूळ गांव-राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संघाचे वरिष्ठ लेखाधिकारी सदाशिवराव श्रीपती पाटील (रा. हिरवडे खालसा) यांनी फिर्याद दिली आहे. 

जन्या पुणे-बेंगलोर महामार्गावर हॉटेल ओपल शेजारी "गोकुळ' ची शॉपी आहे. या शॉपीतून दुग्धजन्य पदार्थांची होलसेल विक्री केली जाते. अमित हा या शॉपीचा इनचार्ज कम क्‍लार्क आहे. या शॉपीतून विकल्या गेलेल्या मालाचे सुमारे 63 लाख रूपये संघाकडे न भरता अमितने त्याचा परस्पर अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. 1 एप्रिल 2016 ते 14 जुलै 2017 या कालावधीत हा अपहार घडला आहे. सुरूवातीला हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू होते, पण यासंदर्भातील बातम्या आल्यानंतर व्यवस्थापनाने या शॉपीचे लेखा परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. संघाचे चार्टर्ड अकौंटंट सुशांत फडणीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कालावधीचे लेखा परीक्षण केल्यानंतर हा अपहार उघडकीस आला. 
श्री. फडणीस यांनी केलेल्या लेखा परीक्षण अहवालात पवार याने संघाकडे भरलेले 18 लाख 20 हजार रूपयांचे धनादेश वटलेले नाहीत. 32 लाख 43 हजार रूपयांचा मालच शॉपीत नाही तर या शॉपीतून विकण्यात आलेल्या मालाचे 12 लाख 84 हजाराची रक्कम संघाकडे जमा केलेली नाही. या तिन्हीही मुद्याच्या आधारे त्याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर केला. या प्रकरणातील संशयित अमित हा माजी संचालिकेचा मुलगा आहे. त्यामुळे हे प्रकरण पैसे भरून मिटवण्याच्या हालचाली सुरू होत्या. अद्याप या प्रकरणी अमितला अटक करण्यात आलेली नाही. 

"सकाळ' ने वाचा फोडली 
"गोकुळ' च्या या शॉपीत 65 लाखांचा अपहार झाल्याची बातमी सर्वप्रथम "सकाळ' ने दिली होती. सहा महिन्यापुर्वीच हा अपहार उघडकीस आला होता. पण कारवाईसाठी टाळाटाळ सुरू होती. पण "सकाळ' ने वाचा फोडल्यानंतर तातडीने या शॉपीचे लेखा परीक्षण करून आज याप्रकरणी अमित पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com