मुलांसोबत क्रिकेट, पत्नीसोबत कॅरम; खासदार मंडलिक यांची दिनचर्या 

सकाळी उठल्यानंतर मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेणे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय व सीपीआर हॉस्पिटल प्रशासनाशी फोनवरून संपर्क साधून रोजचा आढावा घेणे, त्यानंतर मुलगा विरेंद्रसिंह यांच्यासोबत क्रिकेटचा आनंद घेणे, दुपारी जेवण आणि सायंकाळनंतर पत्नी सौ. वैशालीसह दोन्ही मुलासोबत कॅरम खेळणे असा दिनक्रम प्रा. संजय मंडलिक यांचा आहे
MP Sanjay Mandlik Spending Time with Family
MP Sanjay Mandlik Spending Time with Family

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन, संसदेचे अधिवेशनही संपलेले, त्यामुळे सक्तीने घरात बसण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत घरात पत्नीसोबत कॅरम खेळणे, मुलांसमवेत घरासमोरच्या लॉनवर क्रिकेट खेळणे आणि त्यानंतर विविध पुस्तकांचे वाचन हा दिनक्रम आहे कोल्हापुरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संसदेचे अधिवेशन गुंडाळण्याची वेळ आली. त्यानंतर कोल्हापुरात दाखल झालेल्या प्रा. मंडलिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला हजेरी लावून प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. आजही मुंबईहून मतदार संघातील जवळपास 150 लोक कोल्हापुरात आले होते, त्यांची व्यवस्था करण्यात सकाळपासून व्यग्र होते.

सकाळी उठल्यानंतर मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेणे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय व सीपीआर हॉस्पिटल प्रशासनाशी फोनवरून संपर्क साधून रोजचा आढावा घेणे, त्यानंतर मुलगा विरेंद्रसिंह यांच्यासोबत क्रिकेटचा आनंद घेणे, दुपारी जेवण आणि सायंकाळनंतर पत्नी सौ. वैशालीसह दोन्ही मुलासोबत कॅरम खेळणे असा दिनक्रम प्रा. मंडलिक यांचा आहे.

याशिवाय त्यांना वाचनाची आवडे आहे, त्यात प्राचार्य सुनिलकुमार लवटे यांनी त्यांना जवळपास 25 पुस्तके वाचण्यासाठी पाठवली आहेत. जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत ही सर्व पुस्तके वाचून काढण्याचा त्यांचा मनोदय आहे. आतापर्यंत फांससारख्या दोन-ती कांदबऱ्या वाचून झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या दैनंदिन कामाबरोबरच कोरोनाशी संबंधित प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मतदार संघातील गावात केलेली कामे, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची मदत लागली तर त्यासाठीचा अधिकाऱ्यांचा संपर्क ही कामे सुरूच आहेत. घरात बसून वेळ जात नाही, त्यात लोकांच्या संपर्कात राहण्याची सवय तरीही नाईलाजाने हे सर्व सहन करावे लागत असल्याचे त्यांचे मत.

लोकांनी संयम ठेवावा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. जनतेची काळजी म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात जीवनावश्‍यक वस्तुंचा शक्‍य तेवढा पुरवठा करण्याचे प्रयत्न केले जातील. फक्त लोकांनी घरात थांबावे, गर्दी करू नये, सुरक्षित अंतर ठेवून रहावे आणि सर्वात महत्त्वाचे संयम ठेवावा असे आवाहन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com