खासदार धैर्यशील माने यांनी पुरवला लेकीचा हट्ट

अवघ्या पाच-सहा वर्षाच्या चिमुरड्या आदिश्रीने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेतील शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, आरपीआयचे नेते रामदास आठवले, राष्ट्रवादीचे नेते प्रफ्फुल पटेल, खासदार अमोल कोल्हे, नवनीत राणा, अगांथा संगमा अशा दिग्गजांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या.
MP Dhairyasheel Mane Took Her Daughter to Parliament
MP Dhairyasheel Mane Took Her Daughter to Parliament

कोल्हापूर : देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेविषयी सर्वांनाच आदर आणि ते पाहण्याची प्रत्येकाची इच्छा. देशातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचा वास्तव असलेल्या या संसदेच्या सेंटर हॉलमध्ये आज हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांची कन्या आदिश्री हिने प्रवेश केला आणि सर्वच नेत्यांनी तिची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी आदिश्रीनेही त्यांच्यासोबत आपले फोटो काढून घेण्याचा हट्ट केल्यानंतर या नेत्यांनीही तिचा हा हट्ट पुरवला.

अवघ्या पाच-सहा वर्षाच्या चिमुरड्या आदिश्रीने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेतील शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, आरपीआयचे नेते रामदास आठवले, राष्ट्रवादीचे नेते प्रफ्फुल पटेल, खासदार अमोल कोल्हे, नवनीत राणा, अगांथा संगमा अशा दिग्गजांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या.

कोण विरोधक, कोण सत्ताधारी याची कोणतीही जाण नसलेल्या आदिश्रीने सर्वांचीच मने जिंकली. श्री. पवार यांनी तर तिला आपल्या व श्री. पटेल यांच्यामध्ये बसवून तिची विचारपूस केली. मंत्री स्मृती इराणी यांनी तर तिला चक्क मिठी मारली. खासदार माने यांनीच या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले आणि बघता बघता त्याला चांगल्या लाईक्‍सही मिळाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com