सलग सातव्यांदा कोल्हापुरचे महापौरपद महिलांसाठी आरक्षित  

सलग सातव्यांदा कोल्हापुरचे महापौरपद महिलांसाठी आरक्षित  

कोल्हापूर : कोल्हापूरचे महापौरपद सलग सातव्यांदा महिलांसाठी आरक्षित राहीले आहे. ऑक्‍टोंबर 2020 मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर पहिल्या अडीच वर्षासाठी महापौरपद हे नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) महिलेसाठी आरक्षित झाले आहे. गेल्या वीस वर्षात विविध प्रकारच्या महिला आरक्षणातून 13 महिलांना महापौर व्हायची संधी मिळाली आहे.

कोल्हापूर महापालिकेला 2005 मध्ये सौ. सई खराडे यांच्या रुपाने महिला महापौर मिळाल्या. त्यांना अडीच वर्षे संधी मिळाली. त्यानंतर खुल्या प्रवर्गातून उदय साळोखे, सागर चव्हाण यांनी हे पद भूषविले. 2010 पासून मात्र सतत महिला आरक्षण पडले आहे. 2010 मध्ये अडीच वर्षासाठी मागासवगींय महिला या प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते. या आरक्षणातून वंदना बुचडे ,कादंबरी कवाळे आणि जयश्री सोनवणे या तीन महिला महापौर झाल्या. त्यानंतर पुन्हा खुला प्रवर्ग महिला यासाठी आरक्षण पडले. यामधून प्रतिभा नाईकनवरे, सुनिला राऊत, तृप्ती माळवी, वैशाली डकरे यांना महापौर होण्याची संधी मिळाली.

2015 मध्ये पुन्हा अडीच वर्षासाठी ओबीसी महिला हे आरक्षण पडले. या आरक्षणातून अश्‍विनी रामाणे, हसिना फरास यांना महापौर होण्याची संधी मिळाली.त्यानंतर खुल्या प्रवर्गातून शोभा बोंद्रे, सरिता मोरे आणि माधवी गवंडी यांना संधी मिळाली आहे. गेल्या वीस वर्षात सुमारे 13 हून अधिक महिलांना महापौर होण्याची संधी मिळाली आहे. आणखीन अडीच वर्षे या पदावर महिलाच विराजमान होणार आहेत. आता 2020 सालासाठीच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबई येथे पार पडली. यामध्ये कोल्हापूरचे महापौरपद पुन्ह ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षीत झाले आहे. त्यामुळे या पदावर पुन्हा महिला नगरसेविकाच विराजमान होतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com