(व्हिडिओ) महागावच्या सरपंचांना अश्रू अनावर; अश्रू ढाळत केले घरात थांबण्याचे आवाहन

सरपंचांकडे गावचे पालकत्व असते. म्हणूनच गावच्या सुरक्षेची जबाबदारी सरपंचावर असते. आईच्या भूमिकेतून चाकरमानी तरूणांना मी आवाहन केले आहे. गावकऱ्यांना सुरक्षित वाटेल असे वर्तन करावे. रागाची प्रवृत्ती बाळगू नका. प्लीज घरात बसा. गावच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावरही आहे.हे विसरू नका असे आवाहनमहागावच्या(ता. गडहिंग्लज) सरपंच ज्योत्स्ना पताडे यांनी गावातल्या लोकांना केले. हे आवाहन करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
Mahagaon Sarpanch Became Emotional While Appealing about Lock Down
Mahagaon Sarpanch Became Emotional While Appealing about Lock Down

गडहिंग्लज  : खरे तर कोणत्याही संकटावेळी माणूस देवाचा धावा करतो. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीत पुणे, मुंबईकरच आमचे देव आहेत. संपूर्ण गावातर्फे मी तुमच्यासमोर नतमस्तक होते. गावची परिस्थिती समजून घ्या. बाहेर फिरू नका. तुम्हाला होम क्वारंटाईन केले आहे. तुम्ही घरीच बसा. गावच्या विकासात देणगी देण्यासाठी सातत्याने पुढे येणारे पुणे-मुंबईकरच कोरोना विषाणू पसरविण्यातही पुढे होते, असा तुमच्यावरील ठपका मला सहन होणार नाही. यामुळे सद्य परिस्थिती समजून घेवून गावाला सहकार्य करा.....अश्रू ढाळत महागावच्या (ता. गडहिंग्लज) सरपंच ज्योत्स्ना पताडे भावना व्यक्त करीत होत्या.

सरपंच सौ. पताडे यांची ही भावना प्रातिनिधिक आहे. सर्वच खेड्यांतील सरपंचांनी चाकरमान्यांसमोर हात टेकले आहेत. प्रत्येकाची भावना हीच आहे. कोरोना विषाणू बाधित पुणे व मुंबई शहरातून पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या तरूणांची फौज आपापल्या गावात दाखल झाली आहे. आरोग्य यंत्रणेने त्यांना होम कॉरंटाईनचे शिक्के मारलेत. तरीसुद्धा चाकरमानी मोकाट फिरत आहेत. काही ठिकाणी पार्ट्याही सुरू आहेत. 

यामुळे गावकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार होत आहे. सांगूनही ऐकेनासे झाल्याने दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात काठी घेतली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदारांनी मोकाट फिरणाऱ्या पुणे-मुंबईकरांची नावे कळविण्यास सांगनू कारवाईचा इशारा दिला आहे. तरीही आपल्याच गावची पोरं आहेत या भावनेतून पदाधिकारी संयमाची भूमिका घेत आहेत. परंतु त्याचाही अधिक गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आहे.

भावांनो...तुमच्या गावासाठीच...

आपलं गाव सर्वांगसुंदर, विकासाभिमुख आणि आरोग्यपूर्ण असावे यासाठी चाकरमान्यांकडून मदतीचे हात नेहमीच पुढे येतात. हे गावानेही मान्य केले आहे. ज्या गावच्या भल्यासाठी आपण आर्थिक हातभार लावत आहात, त्याच गावातील ग्रामस्थ कोरोना विषाणूच्या वातावरणात असुरक्षित असतील तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही अप्रत्यक्षपणे आपल्यावरच येते. म्हणूनच गावचे पदाधिकारी ओरडून सांगताहेत तर ऐका, असे आवाहन प्रत्येक सरपंच करताना दिसत आहेत.

सरपंचांकडे गावचे पालकत्व असते. म्हणूनच गावच्या सुरक्षेची जबाबदारी सरपंचावर असते. आईच्या भूमिकेतून चाकरमानी तरूणांना मी आवाहन केले आहे. गावकऱ्यांना सुरक्षित वाटेल असे वर्तन करावे. रागाची प्रवृत्ती बाळगू नका. प्लीज घरात बसा. गावच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावरही आहे. हे विसरू नका - ज्योत्स्ना पताडे, सरपंच महागाव (ता. गडहिंग्लज)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com