'तबलीगी जमाती'तून आलेले 10 जण कोल्हापुरात 'क्वॉरंटाईन'!

दिल्लीतून आलेल्यांची वैद्यकीय तपासणी झाली आहे. यापैकी पाच मुस्लिम आणि तीन हिंदु आहेत. हे सर्व धार्मिक कार्यक्रमाला गेले आहेत असेही नाही.-डॉ. अभिनव देशमुख,पोलीस अधीक्षक
daulat desai
daulat desai

कोल्हापूर: दिल्लीतील हजरत निजामुद्दीन भागात तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये कोल्हापूरमधील 19 जणांचा समावेश आहे. यापैकी 9 व्यक्ति बाहेरील राज्यात आहेत. तर, दहा व्यक्ति कोल्हापूरात जिल्ह्यात आल्या असून त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.

केंद्र सरकारने कोरोनाबाबत जाहीर केलेली संचारबंदी डावलून दिल्लीतील हजरत निजामुद्दीन या गजबजलेल्या ठिकाणी 'तबलीगी जमात' या धार्मिक संस्थेने नवी दिल्लीतील मरकझ इमारतीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील मुस्लिम लोकांनी हजेरी लावली होती. यामध्ये कोल्हापूरातील 21 जणांचा समावेश असल्याची यादी व्हायरल झाली होती.

याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, केंद्र सरकारकडून काल दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील काही व्यक्तिंनी भाग घेतला अशी माहिती व यादी आली होती. अशी 21 जणांची यादी आली होती. पण प्रत्यक्ष 19 जणांचा सहभाग होता. या सर्व व्यक्तिंचा शोध जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने लावलेला आहे. 19 पैकी 9 जण दिल्ली, हरियाणा येथे आहेत. तर उर्वरित 10 जण कोल्हापूरात आले आहेत. त्या दहा ही लोकांशी बोलणे झालेले आहे. त्या सर्वांना क्‍वॉरंटाईन केले आहे. या सर्वांची अत्यावश्‍यक सर्व तपासणी केली जाईल. तसेच, त्यांना चौदा दिवस जिल्हा प्रशासनाच्या निगराणीखाली ठेवले जाईल. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नका, असे आवाहनही श्री देसाई यांनी केले.
 
बाहेरील 70 हजार लोक कोल्हापूरमध्ये

कोल्हापूरात बाहेरील जिल्ह्यातून व परदेशातून आलेल्या लोकांवर लक्ष ठेवले जात आहे. प्रभाग समिती व ग्राम समितीमार्फत लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत 70 हजार लोक कोल्हापूरमध्ये आल्याच्या नोंदी आहेत. त्यांचा वैयक्तिक माहिती घेतली जात आहे. त्यांना दररोज तपासणी केली जात आहे. त्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ सीपीआरमध्ये उपचार केले जात असल्याचेही श्री देसाई यांनी सांगितले.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com