kolhapur collector daulat desai warns private doctors | Sarkarnama

घरात बसणाऱ्या डॉक्‍टरांनी आपले दखावाने तात्काळ सुरू करावेत, अन्यथा...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

पालकमंत्री सतेज पाटील यांचीही आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी डॉक्‍टर असोसिएशनसोबत बैठक झाली. यावेळी श्री पाटील यांनी कानउघडनी केली.

कोल्हापूर : एकीकडे कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, महापालिका व इतर शासकीय यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. तर दुसरीकडे ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या रुग्णांना वेठीस धरत जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद करून घरात बसणाऱ्या डॉक्‍टरांनी आपल दखावाने तात्काळ सुरू केले नाही तर त्यांच्यावर आपत्कालिन कायद्यातंर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांचीही आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी डॉक्‍टर असोसिएशनसोबत बैठक झाली. यावेळी श्री पाटील यांनी कानउघडनी केली.

श्री देसाई म्हणाले, देशात आणि राज्यातील शासकीय यंत्रणा, सरकार रुग्णालयातील डॉक्‍टर, पोलीस आपआपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. अशा वेळेला जिल्ह्यातील खासगी दवाखाने सुरू ठेवण्याची जबाबदारी डॉक्‍टरांची आहे. मात्र, खासगी दवाखाने बंद ठेवल्यामुळे ताप, सर्दी, खोकला किंवा इतर उपचारासाठी लोक सीपीआरमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे, उद्यापासून हे दवाखाने सुरू झाले पाहिजेत. दवाखाने सुरू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. खासगी डॉक्‍टरांना अनेक वेळा विनंती केली, आवाहन केले. पण, अजूनही दवाखाने बंद असतील तर हे योग्य नाही. खासगी डॉक्‍टरांनी स्वत:ची काळजी घेत, रूग्णांना सेवा दिली पाहिजे. शासकीय दवाखान्यातील डॉक्‍टर आपले काम प्रामाणिकपणे करत असताना खासगी डॉक्‍टरांनीही सामाजिक बांधिलकी दाखवली पाहिजे, अशी कानउघडणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख