भपकेबाजी न करता अमल महाडिकांकडून विकास कामे : माजी सरपंच किल्लेदार 

''दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये 1 हजार 150 कोटी रुपयांचा निधी खेचून आमदार अमल महाडिक यांनी विकासपर्वच अवतरून दाखविले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात दक्षिणमध्ये सर्वाधिक विकास कामे झाली. अशा कार्यकर्तृत्ववान आमदार महाडिक यांची कामगीरी लक्षणीय आहे. त्यांचा विजयी करावे,'' असे आवाहन माजी सरपंच बच्चाराम किल्लेदार यांनी केले. निगवे खालसा गावात झालेल्या पदयात्रेनंतर ते बोलत होते. पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
Amal Mahadik Padyatra
Amal Mahadik Padyatra

चुये : ''दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये 1 हजार 150 कोटी रुपयांचा निधी खेचून आमदार अमल महाडिक यांनी विकासपर्वच अवतरून दाखविले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात दक्षिणमध्ये सर्वाधिक विकास कामे झाली. अशा कार्यकर्तृत्ववान आमदार महाडिक यांची कामगीरी लक्षणीय आहे. त्यांचा विजयी करावे,'' असे आवाहन माजी सरपंच बच्चाराम किल्लेदार यांनी केले. निगवे खालसा गावात झालेल्या पदयात्रेनंतर ते बोलत होते. पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

किल्लेदार म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या स्वप्नातील प्रगतीशील भारत घडवण्याची सुरवातच आमदार महाडिक यांनी दक्षीण मतदार संघातून केली. त्यांना पुन्हा निवडून देवून पंतप्रधान श्री. मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करुया.''मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजूंना मदत, वॉटर एटीएम, रस्ते, गटर, हायमास्ट दिवे, सुकन्या योजनेतून 6000 मुली दत्तक, यासह अनेक उपक्रम आमदार महाडिक यांनी राबवले असल्याचे सरपंच पांडुरंग महाडेश्वर यांनी नमूद केले. 

यावेळी रणरणत्या उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थानी या प्रचारफेरीमध्ये मोठया उत्साहात सहभाग घेतला. गावांतील शिवाजीनगर, नवीन वसाहत, म्हसोबा माळ, ढगे गल्ली, कांजर गल्ली, कुंभार गल्ली, भीमनगर या प्रमुख मार्गावर फेरी निघाली. आमदार महाडिक यांनी मतदाराशी थेट संवाद साधत गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा पुस्तक स्वरुपात मांडला. 

पदयात्रेला जगदीश चैगुले, शहाजी शिंदे, संदीप कळमकर, तुषार पाटील, अशोक पाटील, सुमित चैगुले, नेताजी पाटील, केटी किल्लेदार, दत्ता पाटील, संभाजी किल्लेदार, बाबुराव पाटील, शिवाजी पाटील, संदीप किल्लेदार, सचिन पाटील, चंदू कांबळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com