कोल्हापुरची 'नस नि नस' माहित असलेला बेधडक नेता! 

कोल्हापुरचे राजकारण असो किंवा राजकीय नेते त्यांची "नस नि नस' माहित असलेला नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम. स्वतः डॉ. कदम हेच अनेकदा आपल्या भाषणात कोल्हापुरचे मला काय सांगू नका, मी सगळ्यांना ओळखतो, कोण कोणाला मिठ्ठी मारतो, कोणाला चोरून भेटतो याची जंत्री माझ्याकडे आहे, असे ते जाहीरपणे म्हणायचे.
कोल्हापुरची 'नस नि नस' माहित असलेला बेधडक नेता! 

कोल्हापुरचे राजकारण असो किंवा राजकीय नेते त्यांची "नस नि नस' माहित असलेला नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम. स्वतः डॉ. कदम हेच अनेकदा आपल्या भाषणात कोल्हापुरचे मला काय सांगू नका, मी सगळ्यांना ओळखतो, कोण कोणाला मिठ्ठी मारतो, कोणाला चोरून भेटतो याची जंत्री माझ्याकडे आहे, असे ते जाहीरपणे म्हणायचे. एक बेधडक, स्पष्टवक्ता व पक्षांसाठी कोणतीही तडजोड न करणारा नेता अशीच डॉ. कदम यांची ओळख राहीली. सात वर्षे पालकमंत्रीपद आणि त्यानंतर प्रत्येक निवडणुकीसाठी पक्षाचे निरीक्षक म्हणून त्यांचा कोल्हापुरशी जवळचा संबंध राहीला. 

राजकारण करताना काही संकेत पाळावे लागतात, विशेषतः ज्याच्या विरोधात बोलायचे, किमान ती व्यक्ती समोर नसावी पण डॉ. पतंगराव कदम त्याला अपवाद होते. जे बोलायचे, ज्याला सुनवायचे ते त्या व्यक्तीच्या समोर हा त्यांचा बेधडकपणा कायम स्मरणात रहाणार आहे. त्याचा अनुभव माजी आमदार महादेवराव महाडीक, सतेज पाटील, कै. सदाशिवराव मंडलिक यांच्यासह अनेकांना घेतला आहे. कॉंग्रेस कमिटीतील अनेक बैठकांत त्यांच्या बेधडक स्वभावाचा अनुभव अनेकांना आला आहे. त्यांनी जिल्ह्यात एक आदरयुक्त दरारा निर्माण केला होता, त्यातून त्यांची जिल्ह्याच्या राजकारणावरही वचक होती. 
2010 ची महापालिकेची निवडणूक कॉंग्रेसने चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला. डॉ. कदम पक्षाचे निरीक्षक, दुपारी 1 वाजता त्यांच्या उपस्थितीत एका हॉटेलमध्ये बैठक होती. बैठकीला महादेवराव महाडीक हवेत पण दुपारची वेळ श्री. महाडीक यांची झोपण्याची. बैठकीला महाडीक येणार नाहीत असे समजल्यावर "लावा त्यांना फोन' म्हणत डॉ. कदम यांनी फोन लावण्यास सांगितले. आज बैठक आहे, तुम्ही यायला पाहीजे, लगेच या मी थांबलोय असा निरोप त्यांनी श्री. महाडीक यांना दिला आणि काही वेळातच महाडीक बैठकीला हजर झाले. 

त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात पक्षाने जिल्ह्यात चांगले दिवस बघितले. महाडीक-सतेज यांच्यातील वादही मिटवण्यात त्यांचा पुढाकार राहीला, वाद मिटला नाही पण तो मिटवत असताना या दोघांनाही त्यांनी दिलेला इशारा आजही आठवणीत रहाण्यासारखा आहे. पक्षापेक्षा कोणी मोठा नाही, व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे, हे ध्यानात ठेवा या शब्दात त्यांनी या दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. अलिकडेच डिसेंबरमध्ये सतेज पाटील यांनीच बोलवलेल्या कार्यक्रमाल डॉ. कदम यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रमुख पाहुणे होते. अलिकडे कॉंग्रेसमधील गटबाजी त्यांच्या कानावर गेली होती. महाडीक-सतेज वाद आता वैयक्तीक पातळीवर पोहचला आहे हेही त्यांना माहित होते, पण तरीही सतेज यांच्याच कार्यक्रमात श्री. महाडीक यांनी आता सन्मानाने कॉंग्रेसमध्ये यावे असे जाहीरपणे सांगून एकच खळबळ उडवून दिली. 
कोल्हापुरातही त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारले. स्थानिक नेत्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांची फी माफीही त्यांनी केली. त्यांची सांगली ही जन्मभुमी, कर्मभुमी असली तरी कोल्हापुरशी असलेला त्यांचा जिव्हाळाही तेवढाच मोठा होता. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील कॉंग्रेस व त्यांच्या मित्र परिवारातही पोकळी निर्माण झाली आहे. 
  
कै. मंडलिकांशी विशेष स्नेह 
माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांच्याशी डॉ. कदम यांचा विशेष स्नेह होता. हे दोघेही यशवंतराव मोहिते यांचे नेतृत्त्व मानणारे, त्यामुळे एकमेकांचे भाऊ असल्यासारखी त्यांची वर्तणूक होती. कै. मंडलिक हे राष्ट्रवादीत गेल्यानंतरही त्यांच्याशी असलेल्या मैत्रीत डॉ. कदम यांनी कधी अंतर पडू दिले नाही, किंबहुना त्यांच्या प्रत्येक निवडणुकीला अर्थिक रसद तेच पुरवत राहीले. मंडलिक-मुश्रीफ वाद मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तो मिटत नाही असे लक्षात येताच त्यांनी कै. मंडलिक यांनाच बळ दिले. 
  
सतेज यांना उमेदवारी दिली 
दोन वर्षापुर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसची उमदेवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. सतेज पाटील यांच्यासह श्री. महाडीक, पी. एन. व आवाडे असे दिग्गज या स्पर्धेत होते. पण डॉ. कदम यांनी सतेज यांना ही उमेदवारी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com