फक्‍त 15 दिवसांत बाजी पलटवलेला आमदार!  - kolhapur amal mahadik birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

फक्‍त 15 दिवसांत बाजी पलटवलेला आमदार! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 एप्रिल 2018

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार अमल महाडीक म्हणजे शांत, मिताभाषी नेतृत्त्व. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार अमल महाडीक म्हणजे शांत, मिताभाषी नेतृत्त्व. पदवीधर असलेल्या अमल यांनी अवघ्या 15 दिवसांत तयारी करून 2014 विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांचा पाच हजार मतांनी पराभव केला. 

विधानसभेची निवडणूक लागली आणि मंत्री पाटील यांच्याविरोधात कोण ? या चर्चेला सुरूवात झाली. सुरूवातीला एकतर्फी होईल अशी वाटलेली ही निवडणूक अमल यांच्या उमेदवारीने रंगतदार झाली. अमल यांचे वडील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी त्यांचा बळाचा पट मुलाच्या मागे लावला आणि त्यांचा विजय सुकर झाला. 

गेल्या तीन साडेतीन वर्षात मोठा जनसंपर्क अमल यांनी मतदारसंघात ठेवला आहे. निमशहरी असलेल्या या मतदार संघात अनेक विकासाची कामे त्यांनी केली. या मतदार संघातील गांधीनगरसह 13 गावांची पाणीपट्टी 50 टक्के करण्यात त्यांचा पुढाकार राहीला. सत्तेसोबत असल्याने शासकीय दरबारीही त्यांची कामे पटापट होता. ते स्वतः सरकारसोबत, त्यांच्या पत्नी सौ. शौमिका महाडीक ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तर चूलतभाऊ धनंजय महाडीक हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने मतदार संघातील कामांना त्यांना मोठा हातभार लागत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख