माणिकराव कोकाटेंच्या ग्रामस्थांची 'राष्ट्रवादी'च्या समीर भुजबळांना 55 हजारांची देणगी

रतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाल्याने सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची उमेदवारीची संधी हुकली. त्यांनी आता अपक्ष उमेदवारीचा निर्णय जाहीर केला आहे. सिन्नर व सोमठाणे या परिसराच्या पाठींब्यावर त्यांनी उमेदवारीची घोषणा केली. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ काल कोकाटे यांच्या गावात प्रचाराला आले असतचा त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. यावेळी युवकांनी वर्गणी गोळा करुन भुजबळ यांना पंच्चावन्न हजारांचा निवडणुक निधी दिल्याने तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
माणिकराव कोकाटेंच्या ग्रामस्थांची 'राष्ट्रवादी'च्या समीर भुजबळांना 55 हजारांची देणगी

सिन्नर : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाल्याने सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची उमेदवारीची संधी हुकली. त्यांनी आता अपक्ष उमेदवारीचा निर्णय जाहीर केला आहे. सिन्नर व सोमठाणे या परिसराच्या पाठींब्यावर त्यांनी उमेदवारीची घोषणा केली. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ काल  कोकाटे यांच्या गावात प्रचाराला आले असतचा त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. यावेळी युवकांनी वर्गणी गोळा करुन भुजबळ यांना पंच्चावन्न हजारांचा निवडणुक निधी दिल्याने तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या शर्यतीत असलेले तालुक्‍याचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे मूळ गाव असलेल्या सोमठाणे (ता. सिन्नर) येथील अकरा शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना निवडणुकीसाठी 55 हजार रुपयांची मदत केली. विठ्ठल कोकाटे, बाळासाहेब धोक्रट, संजय धोक्रट, दत्तात्रय कोकाटे, समाधान धोक्रट, कुंतल कोकाटे, माधव वैद्य, नितीन धोक्रट, तबाजी साळुंखे, संदीप धोक्रट यांनी प्रत्येकी पाच हजार 101 रुपये, तर दत्तात्रय धोक्रट यांनी पाच हजार रुपयांची रोख मदत भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केली. यापुढेही तन मन धनाने मदत करुन शेतकरी विरोधी भाजपचे सरकार हद्दपार करण्यासाठी योगदान देऊ, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

यावेळी माजी खासदार भुजबळ यांनी स्वागतानंतर सरकारच्या च्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेती व्यवसाय डबघाईस येऊन ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली आहे. कमी पाण्यात शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवूनही त्याला जेमतेम भावही मिळत नसल्याने अशा सरकारला सत्तेत राहाण्याचा नैतिक अधिकार नसल्याने या निवडणुकीत भाजपला आपली जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. सोमठाणे (ता. सिन्नर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.

माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, निवृत्ती अरिंगळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, कैलास झगडे, वामन पवार, संतोष कदम, सुधार राऊत, प्रमोद सांगळे आदी या वेळी उपस्थित होते. सिन्नर तालुक्‍यातील देवपूर गटातील पंचाळे येथून सुरू झालेल्या या दौऱ्यात श्रीरामपूर, शिंदेवाडी, पिंपळगाव- धनगरवाडी, सांगवी, दहीवाडी, महाजनपूर, उजणी, शहा, कारवाडी, विघनवाडी, कोळगावमाळ, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मिरगाव, मिठसागरे येथे प्रचारदौरा झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com