kokate and sharad pawar | Sarkarnama

जिजामाता याच शिवाजीच्या गुरू : पवारांच्या भूमिकेला श्रीमंत कोकाटेंचा पाठिंबा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी गुरु होते याला कुठलाही पुरावा उपलब्ध नसून ते छत्रपतींचे गुरू नव्हते हेच सत्य आहे. जिजामाता याच शिवाजीच्या गुरू होत्या. असे इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी आज स्पष्ट केले. मुंबई प्रेस क्‍लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत कोकाटे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले. 

ते म्हणाले की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज समकालीन असले तरी त्या दोघांमध्ये कसल्याही प्रकारचा संवाद नव्हता. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज त्यांची भेट झाल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. याबाबत अधिक माहिती देताना समकालीन साहित्य बखरी आणि विविध संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला असता रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्यात गुरू-शिष्याचे नाते मुळीच नव्हते हेच आढळून येते असे श्रीमंत कोकाटे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुस्थानी त्यांच्या मातोश्री जिजामाता याच होत्या याबाबत अधिक माहिती देताना जिजामाता यांच्याकडे युद्धकौशल्य होते. प्रशासकीय अनुभव होता. याबाबतचे अनेक दाखले आणि पुरावे उपलब्ध असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांना कमी लेखण्यासाठी रामदास हे त्यांचे गुरू असल्याचे पुढे आणले जाते. यामागे मोठे सांस्कृतिक षडयंत्र असल्याचे कोकाटे म्हणाले. शरद पवार हे राज्यातील एक अभ्यासू नेते आहेत ते सतत वाचन करत असतात. अनेक संदर्भ ते तपासत असतात. त्यामुळे त्यांनी रामदास यांच्या बद्दल केलेले विधान हे अचूक आणि इतिहासाच्या सर्व कसोटीवर टिकणारे असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख