साडेआठ तास चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर 

kohinoor mill ed investigation raj thackrey eight hours
kohinoor mill ed investigation raj thackrey eight hours

मुंबई : कोहिनूर मिलप्रकरणी ईडीने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज साडेआठतास चौकशी केली. या चौकशीनंतर ते ईडी कार्यालयाबाहेर पडले. 

या प्रकरणी ईडीने राज यांच्याबरोबर उन्मेश जोशी, राजन शिरोडकर यांनाही नोटीस बजावली होती. यापूर्वी जोशी आणि शिरोडकर यांचीही चौकशी झाली होती. त्यानंतर राज चौकशीला सामोरे गेले. ईडीच्या नोटीशीनंतर विविध राजकीय पक्षांबरोबरच त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनीही त्यांची पाठराखण केली होती. 

आज सकाळी ते ईडी कार्यालयात जाण्यासाठी निघाले तेंव्हा त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब आणि मनसेचे कार्यकर्तेही होते. ईडीच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते बाहेर होते. आज साडेआठ तास चौकशी झाली. त्यांना उद्या चौकशीसाठी बोलविले नाही. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते आपल्या कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी रवाना झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com