kite politics shivsena attack ex cm fadanvice | Sarkarnama

शिवसेनेची फडणविसांविरोधात पतंगबाजी; "मी पुन्हा नाही येणार, कधीच नाही येणार' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

नाशिक : नाशिकच्या रवींद्र गामणे यांनी या पतंगबाजीला दिलेला राजकीय रंग शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी लहान मुलांना पतंगाचे वाटप केले. त्यात भाजपचे कमळ चिन्ह आणि "मी पुन्हा नाही तर, कधीच नाही येणार' असे वाक्‍य टाकले आहे. आकाशात उडणारे हे पतंग चर्चेत आहेत. 

येथील शिवसेना प्रणीत मुरली फाऊंडेशनचे संस्थापक रवींद्र गामणे यांच्या वतीने हे पतंग उपलब्द केले आहेत. शिवसेनेचे नगरसेवक सुदाम ढेमसे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्याचे लहान मुलांत वाटप करण्यात आले. 

ही मुले परिसरातील मैदानांत, गावात हे पतंग घेऊन बागडत आहेत. काही पतंग उडवतात तर काही पतंग कापले जातात. आकाशात हे विहारत हे पतंग पकडण्यासाठी गेलेल्या मुलांना पतंगावर दर्सनी भागात शिवसेनेचे चिन्ह व जय महाराष्ट्र असे लिहिलेले आहे.

मागच्या बाजुला भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ व "मी पुन्हा नाही येणार, मी पुन्हा कधीच नाही येणार' असे लिहिलेले आढळले. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. 

यंदाच्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' असे म्हटले होते. त्याचा त्यांनी वारंवार उल्लेख केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख