आता तरी उद्धव ठाकरेंना जाग येईल का : किरीट सोमय्या - Kirit Somayya to Uddhav Thakre | Politics Marathi News - Sarkarnama

आता तरी उद्धव ठाकरेंना जाग येईल का : किरीट सोमय्या

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 डिसेंबर 2017

गुजरातच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षात एकत्र असूनही सतत भाजपला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेला चिमटा काढताना भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आता तरी जाग येणार का असा प्रश्न केला आहे.

मुंबई : गुजरातच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षात एकत्र असूनही सतत भाजपला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेला चिमटा काढताना भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आता तरी जाग येणार का असा प्रश्न केला आहे.

गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे निश्चित झाले असून, भाजपने 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेकडून सतत भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच एक्झिट पोलचे आकडे पटले नसल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी राहुल गांधींचे कौतुकही केले होते. किरीट सोमय्या यांनी ट्वीटरद्वारे राहुल गांधींचाही समाचार घेतला आहे. गुजरातच्या जनतेने राहुल गांधींना जबरदस्त उत्तर दिल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

याच मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे, की गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनाला आत्ता तरी जाग येणार का? जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख