उध्दव ठाकरेंपेक्षा मोदींच्या नेतृत्वाची उंची अधिक : किरीट सोमय्या

विधानसभा निवडणुकीत महायुतीत वणवा पेटला आहे. जळगावच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत व्यासपिठावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे छायाचित्र लावले नाही. त्यावरुन नवा वाद सुरु झाला. यावर भाजपचे उपाध्यक्ष किरिट सोमय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकीय उंची उध्दव ठाकरेंपेक्षा अधिक आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवे वादंग सुरु होण्याची शक्‍यता आहे.
Narendra Modi - Kirit Somayya - Uddhav Thakrey
Narendra Modi - Kirit Somayya - Uddhav Thakrey

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीत वणवा पेटला आहे. जळगावच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत व्यासपिठावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे छायाचित्र लावले नाही. त्यावरुन नवा वाद सुरु झाला. यावर भाजपचे उपाध्यक्ष किरिट सोमय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकीय उंची उध्दव ठाकरेंपेक्षा अधिक आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवे वादंग सुरु होण्याची शक्‍यता आहे.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमय्या आज नाशिकमध्ये होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ''पंतप्रधानांच्या सभेचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्या प्रमाणे नियोजन होते. मोदी यांची उंची ठाकरे यांच्या पेक्षा अधिक आहे. येत्या निवडणुकीत महायुतीचं सत्तेवर येईल. त्यांना 233 जागा मिळतील. काही जागांवर बेबनाव असला तरी सामंज्यसातून तोडगा निघेल.''

''देशाला मोदी व राज्याला देवेंद्र यांच्या शिवाय पर्याय नाही. राज ठाकरे यांच्यासह मनसेचे काही खरे नाही. कॉंग्रेसला राष्ट्रीय नेता मिळत नाही तर मुंबईचे अध्यक्ष पद घ्यायला कोणी तयार नाही, राष्ट्रवादीत शरद पवार यांच्या मागे राहणारे दुसऱ्या दिवशी इतर पक्षात दिसतात. त्यामुळे विरोधी पक्ष संपुष्टात आले आहेत.'' असेही सोमय्या म्हणाले. पंजाब व महाराष्ट्र बॅंक महिनाभरात पुर्नजिवित होणार असून सरकारने त्यासाठी फोरम नेमून महत्वाची पावले उचलली आहेत, असाही दावा त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com