विकासकामांचा वेग कायम ठेवण्यासाठी पुन्हा संधी द्या - अर्जुन खोतकर

विकासकामांचा वेग कायम ठेवण्यासाठी पुन्हा संधी द्या - अर्जुन खोतकर

जालना : राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर शहरवासियांना विकासाच्या आशेचा किरण दिसला, राज्य विकासाच्या दिशेने जात असतांना जालना शहराचाही वेगाने विकास होत आहे. हाच वेग यापुढेही कायम ठेवण्यासाठी पुन्हा सेवेची संधी द्या असे आवाहन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. जालना मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज मतदार संघातील मंठा चौफुली परिसरातील लक्ष्मीनगरातील नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा उल्लेख केला. खोतकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि राज्याची वाटचाल विकासाच्या दिशेने होत आहे. त्याचा फायदा जालना शहरालादेखील झाला आहे. 

गेल्या पाच वर्षात नगरपालिका युतीच्या ताब्यात नसतांनाही राजकारण न करता राज्य शासनाने शहरातील अंतर्गत जलवाहिनीसाठी दीडशे कोटींचा निधी दिला .या शिवाय प्रमुख रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी 70 कोटींचा निधी देऊन दर्जेदार कामे केली. यापुढे जालना शहराचा विकास अविरत सुरू ठेवण्यासाठी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुन्हा एकदा सेवेची संधी द्या असे आवाहन अर्जुन खोतकर यांनी उपस्थितांना केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com