उमेदवार मिळवण्यासाठी ज्यांना विरोध केला त्यांच्या दारात राजू शेट्टी जात आहेत - सदाभाऊ खोत

 उमेदवार मिळवण्यासाठी ज्यांना विरोध केला त्यांच्या दारात राजू शेट्टी जात आहेत - सदाभाऊ खोत

पुणे : माझी जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केली नसती तर राजू शेट्टींवर आजच्यासारखी वेळ आली नसती. तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले अशी वेळ आता शेट्टीवर आली आहे अशी घणाघाती टीका कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. 

आपली भूमिका स्पष्ट करताना खोत म्हणाले, राजू शेट्टी म्हणजे कार्यकर्त्यांला दाबून मोठा झालेला माणूस आहे. मांजर वेळप्रसंगी आपल्या पिलाला खाते तशीच ही वृत्ती आहे. आजवर कितीतरी कार्यकर्ते त्यांनी खड्डयात घातले आहेत. मी त्यांना देव मानून काम करत होतो पण त्यांनी माझी हकालपट्टी करून संघटनेच्या बाहेर काढले. माझ्या योगदानाची काहीही दखल घेतली नाही. 

मी जर संघटनेत असतो तर आज त्यांच्यावर अशी उमेदवार शोधण्याची वेळ आली नसती.ज्यांना आम्ही विरोध केला त्यांच्याच दारात जाऊन शेट्टी जागा मागत आहेत याचे सच्च्या कार्यकर्त्याला दुःख होत आहे असे सांगून खोत म्हणाले," माझ्या आयुष्यात मला भेटलेला सर्वात चांगला माणूस म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हा माणूस माझ्या अडचणीच्या काळात सोबत राहिला. मी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. माझ्या घरात राजू शेट्टींचा फोटो नाही पण शेतकऱ्यांचे खरे नेते शरद जोशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा फोटो आहे. 

मी शेतकरी संघटनेत असताना चळवळीत काम करताना कधी घड्याळ बघितले नाही, रात्रीचा दिवस केला. कसलंही माप ठेवलं नाही. शेट्टी मात्र पक्के व्यवहारी आहेत त्यानी माझ्या वडिलांच्या दवाखान्यासाठी दिलेले पैसे जाहीरपणे सांगितले. त्या चेकच्या झेरॉक्‍स काढून वाटल्या, अशा कोत्या मनोवृत्तीच्या माणसाला नेता मानला याचा त्रास होतोय."असे खोत म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com