Khirsagar - Kripashankar expecting holy sweets from Fadnavis | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने गणेशाचे क्षीरसागर - कृपाशंकर यांनी घेतले दर्शन, आता प्रतीक्षा 'प्रसादा'ची  

संजय मिस्कीन
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांना प्रसाद वाटण्यास सुरवात केला आहे . मुख्यांत्रांचे मोदक येत्या दहा दिवसात कोण कोणत्या नेत्यांना गोड वाटतात हे कळणार आहे .  

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांना प्रसाद वाटण्यास सुरवात केला आहे . मुख्यांत्रांचे मोदक येत्या दहा दिवसात कोण कोणत्या नेत्यांना गोड वाटतात हे कळणार आहे .  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी जावून गणेशाचं दर्शन घेतले. तर राष्ट्रवादीचे नाराज नेते जयदत्त क्षिरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जात गणेशाची आरती केली.  या दोघांना भविष्यात काय प्रसाद मिळणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे . तसेच मुख्यमंत्री आणखी कोणत्या नेत्यांना गणेशोत्सवाचे निमित्त साधून पवित्र करून घेणार याबाबत उत्सुकता आहे . 

राज्यात गणेशोत्सवाची धुम सुरू असताना राजकीय पक्षात मात्र गणेश दर्शनाच्या माध्यमातून राजकीय 'प्रसाद' मिळवण्याची खेळी जोरात सुरू झाली आहे. यामधे भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणूकांची नांदी म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीतल्या नेत्यांना पक्षात खेचण्याची रणनिती आखल्याचे चित्र आहे. 

कृपाशंकर सिंह सध्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होत आहेत. न्यायालयाने त्यांना कथित आरोपातून मुक्‍त केल्यानंतर लवकरच ते भाजपात प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. आज मुख्यमंत्री व कृपाशंकर सिंह यांच्यातील मित्रत्वाचे संबध अधिकच दृढ झाल्याचे समोर आले. कॉंग्रेसपासून सध्या कृपाशंकर लांबच आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकांच्या तोंडावर त्यांचा भाजपप्रवेश निश्‍चीत असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या घरी जावून स्वपक्षातील नेत्यांना धक्‍का दिला आहे. गणेशदर्शनाचे निमित्त असले तरी यामागे राजकीय खेळी असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बीड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी  क्षीरसागर   यांच्या निवासस्थानी जावून 'डिनर डिप्लोमसी' केली होती. तेंव्हापासून क्षीरसागर   हे भाजपच्या जवळ असल्याचे मानले जात आहे. 

आज त्यांनी मुख्यमंत्र्याची घरी जावून भेट घेतल्यानं त्यांचाही भाजप प्रवेश निश्‍चीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जयदत्त क्षिरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधू भारतभूषण देखील होते. सध्या बीड जिल्ह्यात जयदत्त  क्षीरसागर   व त्यांचे पुतणे असा राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे जयदत्त यांनी भाजप प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला मोठा धक्‍का असल्याचे मानले जाते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख