पेल्यातील वादळ अखेर थंडावले... खतगावकर करणार भाजपचाच प्रचार...

 पेल्यातील वादळ अखेर थंडावले... खतगावकर करणार भाजपचाच प्रचार...

नांदेड : नायगाव विधानसभा मतदार संघातून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मीनल खतगावकर यांना भाजपची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर निर्माण झालेले बंडखोरीचे वादळ अखेर शमले आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नायगाव मतदारसंघातून डॉ. मिनल खतगावकर यांनाच भाजपची उमेदवारी मिळेल, अशी आशा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह कार्यकर्त्यांना लागून होती. परंतु, भाजपने काल जाहीर केलेल्या यादीत डॉ. मीनल खतगावकर यांना डावलून राजेश पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले. त्यामुळे नरसी-नायगाव, बिलोली, 
धर्माबाद, उमरी आणि देगलूर तालुक्‍यातील खतगावकर समर्थकांनी गुरुवारी राजेंद्रनगर येथील त्यांच्या निवासस्थांनी गर्दी केली होती. 

या कार्यकर्त्यांनी या कौटुंबिक सहविचार सभेमध्ये प्रातिनिधीक स्वरूपात आपल्या तीव्र भावना मांडल्या. " नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी डॉ. मीनल यांनी जिवाचे रान केले. लोकसभेच्यावेळी " मोदी रथ' च्या माध्यमातून वाडी, वस्त्या, तांड्यांवर वेळेच भान न ठेवता प्रचार केला. प्रसार केला, त्याचे फळही भाजपला मिळाले. परंतु, ताईंना उमेदवारी न देता, ज्याने कधीच भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केला नाही त्यांना तिकीट देऊन, " ताईं 'वर अन्याय केला. हा अन्याय आम्ही कधीच सहन करू शकत नाही. पक्ष वाढविण्यासाठी ताईंनी किती कष्ट घेतले याचे साक्षीदार आम्ही आहोत. त्यामुळे दादा आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असून, आम्ही तुमच्यासोबतच राहू,' अशा आशयाच्या भावना कार्यकर्त्यांनी भावूक होत व्यक्त केल्या. 

या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन श्री. खतगावकर यांनी संयत भूमिका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. "भाजप'कधीच घराणेशाहीला महत्त्व देत नाही. राजकारणामध्ये असे असंख्य धक्के येतच असतात. त्यातून, बाहेर कसे पडायचे याला महत्त्व असते. कुठलाही निर्णय हा घाईघाईने घेऊन चालत नसतो. मला शुक्रवारपर्यंत चिंतन करायला वेळ द्या. जो काही निर्णय घेईल तो तुमच्या हिताचाच घेईल; माझ्या हिताचा घेणार नाही, असे आश्‍वासन खतगावकर यांनी या कार्यकर्त्यांना दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com