kharage criticize on bjp and shivsena | Sarkarnama

मोदी- शहांनी देशभक्ती शिकवू नये : मल्लिकार्जुन खर्गे

अविनाश काळे
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

उमरगा : " बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' या संत तुकारामाच्या अभंगाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची, पक्षाच्या प्रमुखाची वाटचाल हवी. मात्र मोदी- शहा या जोडगोळीची " खोटे बोल पण रेटुन बोल' प्रमाणे वाटचाल सुरू आहे, ते आम्हाला देशभक्तीचा सल्ला देताहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून कॉंग्रेस पक्षाची त्यागवृत्ती राहिलेली आहे, त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. 

उमरगा : " बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' या संत तुकारामाच्या अभंगाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची, पक्षाच्या प्रमुखाची वाटचाल हवी. मात्र मोदी- शहा या जोडगोळीची " खोटे बोल पण रेटुन बोल' प्रमाणे वाटचाल सुरू आहे, ते आम्हाला देशभक्तीचा सल्ला देताहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून कॉंग्रेस पक्षाची त्यागवृत्ती राहिलेली आहे, त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. 

संपूर्ण देशात पायाभूत सुविधापासुन माहिती व तंत्रज्ञानाचे जाळे कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकाळात निर्माण झाले आहे. भाजपा सरकारच्या काळात आर्थिक मंदी, संविधानबदलाची भाषा करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. प्रगतशील महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला खंबीर साथ द्या असे आवाहन अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे यांनी केले. उमरगा विधानसभा मतदारसंघाते कॉंग्रेस- राष्ट्रवादी व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार दिलीप भालेराव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शिवाजी चौकात आयोजीत प्रचार सभेत खर्गे बोलत होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष, आमदार बसवराज पाटील, जयपाल रेड्डी, बस्वकल्याणचे आमदार बी. नारायण, आळंदचे माजी आमदार बी. आर. पाटील आदींची उपस्थिती होती. 

"कॉंग्रेस पक्षाने सत्तर वर्षात काय केले, एवढीच भाषा मोदी - शहांना कळते. देशातील तमाम लोकांना कॉंग्रेस पक्षाच्या उज्वल कार्याची माहिती आहे. मुंबईच्या विमानतळावर हेलीकॉप्टरची तीन तास प्रतिक्षा करावी लागली त्यामुळे सभेला यायला उशीर झाला, याचा संदर्भ देत मोदींनी हवाई वाहतूक ताब्यात घेतली, ईडीही त्यांच्या ताब्यात आहे असा आरोप केला. राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी, धर्मनिरपेक्षता कायम ठेवण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दिलीप भालेराव यांना खंबीर साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले. 
जातीय सलोखा कायम राखीन - भालेराव 
मतदारांनी मला साथ द्यावी, जातीय सलोखा बिघडवण्याचे काम मी कदापीही होणार नाही, तसे झाल्यास आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, माझ्या हातून चूक झाली तर राजकिय संन्यास घेण्याची देखील आपली तयारी असल्याचे दिलीप भालेराव यांनी आपल्या भाषणातून सांगितले. दहा वर्षात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीला विकास साध्य करता आला नसल्याने तालुका पंचवीस वर्ष विकासापासून मागे गेला आहे. सामान्य कुंटुबातला, पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या दिलीप भालेराव यांच्या उमेदवारीसाठी श्रेष्ठीकडे शिफारस केली. जात -धर्म न पाहता पक्षाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी, श्रेष्ठीकडे सन्मान ठेवण्यासाठी श्री. भालेराव यांना मतदारांनी पदरात घ्यावे असे आवाहन करून आमदार बसवराज पाटील यांनी तालुक्‍याला विकासाचे मॉडेल करण्याची जबाबदारी माझी राहिल अशी ग्वाही यावेळी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख