भाजपचे 'संकटमोचक' गिरीश महाजनांमुळे खानदेशला पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे वेध 

भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक' तसेच लोकसभा निवडणूकीत उत्तर महाराष्ट्रातून भाजपचे आठही खासदार निवडून आणणारे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यकतृत्वामुळे खानदेशला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. लोकसभेतील यशाबाबत त्यांचे अभिनंदन करणारे फलक त्यांच्या कार्यकर्त्यानी लावले असून त्यात 'भावी मुख्यमंत्री'असा उल्लेख केला आहे.
भाजपचे 'संकटमोचक' गिरीश महाजनांमुळे खानदेशला पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे वेध 

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक' तसेच लोकसभा निवडणूकीत उत्तर महाराष्ट्रातून भाजपचे आठही खासदार निवडून आणणारे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यकतृत्वामुळे खानदेशला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. लोकसभेतील यशाबाबत त्यांचे अभिनंदन करणारे फलक त्यांच्या कार्यकर्त्यानी लावले असून त्यात 'भावी मुख्यमंत्री'असा उल्लेख केला आहे. 

राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मराठवाडा या भागातील नेते मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. परंतु उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशला मुख्यमंत्रीपदाने नेहमीच हुलकावणी दिली आहे. (कै.)बाळासाहेब मधुकरराव चौधरी, धुळ्याचे रोहिदासदाजी पाटील यांची नावे कॉंग्रेसच्या सत्ताकाळात मुख्यमंत्रीपदासाठी घेतली जात होती. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. भाजपच्या सत्ताकाळात आता मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ खडसे मानले जात होते. मात्र त्यांनाही संधी मिळाली नाही. ते तर थेट मंत्रीमंडळाबाहेरच गेले आहेत. 

भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत. सरकारविरोधात झालेले मोर्चे, आंदोलने यामुळे अडचणीस आलेल्या सरकारला बाहेर काढण्यासाठी महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे. या शिवाय नाशिक,धुळे, जळगाव महापालिकेवर भाजपा झेंडा फडकविला तर आता लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदार संघाची जबाबदारी यशस्वीपणे पेलून त्यांनी आठही उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे पक्षातील त्यांचे वजन वाढले आहे.

तर राज्यातील सरकारमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानंतर क्रमांक दोनचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे फडवीस यांचे पक्षाने वरीष्ठ स्तरावर केंद्रात प्रमोशन केल्यास महाजन यांचा मुख्यमंत्रीपदावर नंबर लागू शकतो अशी भाजपमधील कार्यकर्त्यानाही आशा आहे.त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाच्या फलकावर कार्यकर्त्यानी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. त्यामुळे खानदेशला पुन्हा महाजन यांच्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com