गिरीश महाजनांच्या विरोधातील उमेदवारीवरून जळगाव 'राष्ट्रवादी'त कलह 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा विधानसभा मतदार संघ आहे. गेल्या पाच टर्मपासून या मतदार संघातून ते निवडून येत आहे. त्यांच्या विरोधात अद्यापही भक्कम उमेदवार विरोधकांकडे नाही. येत्या निवडणूकीत भक्कम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमेदवाराचा शोध सुरू आहे.
गिरीश महाजनांच्या विरोधातील उमेदवारीवरून जळगाव 'राष्ट्रवादी'त कलह 

जळगाव : भाजपचे 'संकटमोचक'व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा विधानसभा मतदार संघ जामनेर आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे भक्कम उमेदवाराचा शोध सुरू आहे. आता या मतदार संघातील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अंतर्गत कलह सुरू झाला असून इच्छुक उमेदवारांमध्ये पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्षांसोबत शाब्दीक चकमकही उडाल्याचे सांगण्यात येत आहे. 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा विधानसभा मतदार संघ आहे. गेल्या पाच टर्मपासून या मतदार संघातून ते निवडून येत आहे. त्यांच्या विरोधात अद्यापही भक्कम उमेदवार विरोधकांकडे नाही. येत्या निवडणूकीत भक्कम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमेदवाराचा शोध सुरू आहे. याच मतदार संघातून महाजन यांच्या विरोधात निवडूक लढवून पराभूत झालेले "राष्ट्रवादी'चे माजी जि.प.सदस्य संजय गरूड हे पुन्हा लढण्यासाठी इच्छुक आहेत. या शिवाय इतर बारा जणांनीही लढण्याची तयारी दर्शविली आहे. यात जामनेर येथील पक्षाचे कार्यकर्ते बंगालीसिंह चितोडीया हे सुध्दा मतदार संघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. 

जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पाटील व बंगालीसिह चितोडीया हे आकाशवाणी चौकातील पक्षाच्या कार्यालयात चर्चा करीत असताना, संजय गरूड काही कार्यकर्त्यासह कार्यालयात आले. त्यावेळी गरूड यांनी जामनेर मतदार संघातून आपणच उमेदवारी करणार आहोत असे अॅड.पाटील यांना सांगितले. ते म्हणाले, ''पक्षासाठी जामनेरमध्ये आपण जीवाचे रान करीत आहोत, गेल्या अनेक वर्षापासून महाजन यांच्या विरोधात संघर्ष करीत आहोत. त्यामुळे या मतदार संघात आपणच त्यांच्या विरोधात लढणार आहोत.'' यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.पाटील यांच्यांशी त्यांची शाब्दीक चकमकही झाल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यालयात झालेल्या वादाबाबत पक्ष कार्यकर्त्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com