इम्तियाज जलील यांची वृत्ती रझाकारी - चंद्रकांत खैरे

इम्तियाज जलील यांची वृत्ती रझाकारी - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : रझाकारांच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासासाठी शेकडो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तेव्हा कुठे मराठवाडा मुक्त झाला. मराठवाड्यातील जनतेसाठी हा ऐतिहासिक आणि गौरवाचा दिवस असतो. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाने मराठवाडा मुक्तीदिनाचा कार्यक्रमाला हजर राहून या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करणे अपेक्षित असते. मुख्यमंत्री आर्वजून या कार्यक्रमाला हजर असतात. पण चुकून निवडून आलेले खासदार यांना मराठवाड्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही की काय ? असा प्रश्‍न त्यांच्या सातत्याने गैरहजर राहण्यामुळे पडतो. अशा रझाकारी वृत्तीच्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. 

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला सातत्याने गैरहजर राहिले. आमदार असतांना कार्यक्रमाला टाळण्याची परंपरा त्यांनी खासदार झाल्यावरही पुढे सुरूच ठेवली. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यावर चोहोबाजूंनी टिकेची झोड उठत आहे. या सदंर्भात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलतांना या सदंर्भात नाराजी व्यक्त करत, इम्तियाज यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. खैरे म्हणाले, मराठवाड्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी मराठवाडा मुक्तीदिन हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आमचे वडील, आजोबा यांनी त्या काळात रझाकारांचे अत्याच्यार सहन केले आहे. अनेकांनी आपल्या प्राणांची बाजू लावून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा चालवला. तेव्हा कुठे देशाच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा प्रत्येकाच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. 

लोकप्रतिनिधी म्हणून अशा महत्वाच्या दिवशी आयोजित कार्यक्रमाला हजर राहून मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांबद्दल आदर व्यक्त करण्याची ही संधी असते. पण चुकून निवडून आलेले या शहराचे खासदार इम्तियाज जलील यांना याचा सातत्याने विसर पडतो. किंबहुना त्यांना व त्यांच्या रझाकारी वृतीच्या पक्षाला मराठवाड्याचे हे स्वंतत्र अस्तित्वच मान्य नाही असे दिसते. आमदार असतांना देखील त्यांनी कधी मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती, आणि आता खासदार झाल्यावरही त्यांनी तोच कित्ता गिरवला आहे. अशा जातीयवादी माणसाला निवडून दिल्याची चूक ज्यांनी त्यांना मतदान केले त्या सर्वांना उमगली असेल. मराठवाडा मुक्तीदिन नाकारणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करावी या मागणीचा पुनरूच्चार देखील चंद्रकांत खैरे यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com