खडसे समर्थक उदेसिंग पाडवी काँग्रेसच्या वाटेवर?

खडसे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळेच माझे तिकीट कापले गेले असल्याचे समजते तसेच एकनाथ खडसे यांचेदेखील तिकीट कापले जाण्याची दाट शक्‍यता आहे, अशा पद्धतीच्या मेसेज आमदार उदेसिंग पाडवी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून ते कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे देखील बोलले जाते.
Udesinh Padvi - Eknath Khadse
Udesinh Padvi - Eknath Khadse

नंदुरबार : खडसे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळेच माझे तिकीट कापले गेले असल्याचे समजते तसेच एकनाथ खडसे यांचेदेखील तिकीट कापले जाण्याची दाट शक्‍यता आहे, अशा पद्धतीच्या मेसेज आमदार उदेसिंग पाडवी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून ते कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे देखील बोलले जाते.

नंदुरबार येथील चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवबंधन मानल्यामुळे भाजपाचे डॉक्‍टर विजयकुमार गावित यांच्या समोर उमेदवार कोण? हा प्रश्न अजून देखील कॉंग्रेसला सोडवता आले नसल्याने या जागेवर उदेसिंग पाडवी हे विधानसभेची निवडणूक लढणार की काय? अशी देखील शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. उदेसिंग पाडवी शहादा मतदारसंघांमधून भाजपाकडून गेल्या पंचवार्षिकला निवडणूक लढले होते व त्यांनी कॉंग्रेसचे माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र पाडवी यांच्या पराभव केला होता. मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून स्वतः देखील राजीनामा देणार असल्याचे उघड भूमिका घेत त्यांनी खडसे यांची बाजू उचलून धरली होती. 

उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे दोन गट उघड असून एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय व त्या गटाचे असल्यानेच हे तिकीट कापले गेल्याच्या अप्रत्यक्ष आरोप उदेसिंग पाडवी यांच्याकडून केला जात आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामधील घडामोडी तासातासाला बदलत असून चंद्रकांत रघुवंशी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील कॉंग्रेसचे उमेदवार व कार्यकर्ते गलितगात्र झाले असून आपल्यावर अन्याय झाला पक्षाने डावलले, अशी भावना उदेसिंग पाडवी यांची झाली असल्याने आता ते नंदुरबार विधानसभा क्षेत्रातून माजी मंत्री डॉक्‍टर विजय कुमार गावित यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. 

तसेच कॉंग्रेसचे रिक्त असणारे जिल्हाध्यक्ष पद कोणाला द्यायचे या संदर्भात त्यांचे देखील नाव आता अग्रभागी येत असून कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी बोलणी करायला सुरुवात केली असून प्राथमिक चर्चा होणार असल्याचे आज होणार असल्याचे समजते. दरम्यान उदेसिंग पाडवी यांनी केलेल्या बंडामुळे नंदुरबार जिल्ह्यात शहादा तळोदा विधानसभा क्षेत्र व नंदुरबार विधानसभा क्षेत्रावर काय परिणाम होतात, याकडे देखील जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com