Khadse enquiry befor Zoting committee | Sarkarnama

झोटिंग समितीच्या कार्यक्षेत्रावर खडसेंचा आक्षेप 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्या. दिनकर झोटिंग समितीच्या कार्यकक्षेवर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला आहे.

नागपूर : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्या. दिनकर झोटिंग समितीच्या कार्यकक्षेवर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला आहे. यावर आज दुपारनंतर न्या. झोटिंग समिती निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

भोसरी भूखंड गैरव्यवहाराबाबतची नागपुरात न्या. झोटिंग समितीसमोर सुनावणी सुरू आहे. एकनाथ खडसे आज सलग दुसऱ्या दिवशी झोटिंग समितीसमोर हजर झाले. समितीने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तर खडसे देत आहे. दुपारपर्यंत खडसे यांची सुनावणी सुरू होती. 

दुपारनंतरही त्यांच्या अर्जावर समिती विचार करण्याची शक्‍यता आहे. या अर्जात त्यांनी समिती कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओलांडून चौकशी करीत असल्याचा आक्षेप घेतला आहे. या संदर्भात खडसे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असते ते म्हणाले, ""हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख