is khadase removed from bjp core committee | Sarkarnama

भाजपच्या कोर कमिटीतून एकनाथ खडसे यांची गच्छंती?

रामनाथ दवणे
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीतून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची गच्छंती झाल्याची चर्चा आहे. त्यांच्याऐवजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीतून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची गच्छंती झाल्याची चर्चा आहे. त्यांच्याऐवजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी, शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप रणनीती आखत आहे. त्यांच्या साह्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटिवार हे आघाडीवर आहेत. या नावांत आता महाजन यांचाही समावेश झाला आहे. भाजपमध्ये अनेक बडे नेते आणण्याची जबाबदारी महाजन यांनीच पार पाडली. या प्रक्रियेत खडसे कोठेच नाहीत.

खडसे दिवसेंदिवस अडगळीत पडत चालले आहेत. त्यांना त्यांच्या जळगाव जिल्ह्यातील लोकसभा जागांची चिंता लागली आहे. या वेळी शिवसेना जळगावात दगाफटका करेल, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.  

खडसे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची गेली 25 वर्षे असलेली युती तोडण्याची घोषणा केली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ते पक्षातील राज्याचे नंबर एकचे नेते बनल्याचे चित्र निर्माण झाले होते. सत्तास्थापनेनंतर मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. खडसे हे क्रमांक दोनचे नेते बनले. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे हे स्थानही खालसा झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख