फडणवीसांची भेट झाली, पण चर्चा झालीच नाही तर काय सांगू ? : एकनाथ खडसे

आपली फडणवीस यांच्यावरील नाराजी दूर झाली काय ? या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना खडसे म्हणाले, की आमची कोणतीही चर्चा झाली नाही, त्यापलिकडे आपण काहीही सांगू शकत नाही.
फडणवीसांची भेट झाली, पण चर्चा झालीच नाही तर काय सांगू ? : एकनाथ खडसे

जळगाव : माजी मुख्यंमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यांशी आपली भेट झाली, परंतु कोणतीही चर्चा झाली तर त्याबद्दल आपण सांगणार काय ? असे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी येथे सांगितले. देवेंद्र फडणवीस आज धुळे व नंदुरबार येथे जाहीर सभेसाठी आले होते. त्यासाठी पहाटे जळगाव येथे जैन हिल्सवर आले होते. त्यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यांशी त्यांची भेट झाली. 

खडसे यांनी पुष्पगुच्छ देवून फडणवीस यांचे स्वागत केले. तब्बल पंधरा मिनीटे दोघांनी एका टेबलवर बसून चर्चाही केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने धुळ्याकडे रवाना झाले. यानंतर पत्रकारांशी बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले, देवेंद्र फडणवीस व आपली भेट झाली मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत चर्चा केली त्याखेरीच आपली कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे आपण काहीही सांगू शकत नाही. आपली फडणवीस यांच्यावरील नाराजी दूर झाली काय ? या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना खडसे म्हणाले, की आमची कोणतीही चर्चा झाली नाही, त्यापलिकडे आपण काहीही सांगू शकत नाही. 

यावेळी बोलतांना भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले, की आमच्यात कोणतेही वाद नाहीत. फडणवीस यांचे खडसे यांनी स्वागत केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत आम्ही चर्चा केली. आमची चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com