khadase and cm | Sarkarnama

फडणवीस म्हणाले..." खडसेजी यु आर अॅब्सुलेटली राईट '

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जळगाव : सेनेशी युती करू नये, भाजपला अनुकूल वातावरण आहे. भाजपला एकहाती सत्ता मिळेल असे आपण मुख्यमंत्र्यांना कळविले होते. आजच्या जळगावच्या यशानंतर आपण मुख्यमंत्र्याचे अभिनंदन केले, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, खडसेजी यु आर अॅब्सुलेटली राईट..! अशी माहिती खडसे यांनी दिली. जळगाव महापालिका निवडणूकीत 75 जागापैकी भारतीय जनता पक्षाला तब्बल 57 जागा मिळाल्या. शिवसेनेला फक्त 15 जागा मिळाल्या. 

गेल्या 33 वर्षानंतर सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाचा जळगावात पराभव झालेला आहे. याबाबत भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले, कि जळगावात शिवसेनेशी युती करण्यासाठी आपला सुरवातीपासूनच विरोध होता. भाजपला अनुकूल वातावरण असल्याने शिवसेनेशी युती करू नये असे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अगोदरच कळविले होते. त्यावेळी त्यांनी लक्ष घालतो असे सांगितले होते. त्यानंतर युती झाली नाही. भाजपने स्वतंत्ररित्या निवडणूक लढवली आणि भाजपला मोठे यश मिळाले. आज आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले, त्यावेळी फडणवीस यांनी आपण जे युती न करण्याबाबत सांगितले त्याला सहमती दर्शवित,  "खडसेजी यु आर अॅब्सुलेटली राईट..! असे म्हटले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख