khadase | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

खडसे यांचे खासगी सचिव विधानसभा अध्यक्षांकडे

तुषार खरात : सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई : एकनाथ खडसे यांच्या विरोधी पक्षनेते ते महसूल मंत्री या प्रवासात सावलीसारखे सोबत केलेले त्यांचे खासगी सचिव शांताराम भोई आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून रूजू झाले आहेत. खडसे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून भोई यांचा लौकिक होता. 

खडसे यांच्या कार्यालयाची प्रशासकीय जबाबदारी योग्यपणे त्यांनी सांभाळलीच पण त्यांना अचूक सल्ला देणे, खडसे यांच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, प्राधान्याचे विषय तत्काळ मार्गी लावणे अशी जबाबदारी ते चोखपणे पार पाडायचे. खडसे यांच्याभोवती चिकटलेल्या ब-या वाईट प्रकरणांबाबत भोई यांच्याकडे नेहमीच संशयितपणे पाहिले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर यापूर्वी खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी या पदावर काम केलेल्या कोणत्याही अधिका-यांना पुन्हा नव्या सरकारमधील मंत्र्यांकडे काम करता येणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता. पण हा निर्णय धुडकावत खडसे आणि विनोद तावडे यांनी आपल्या जुन्याच खासगी सचिवांना कायम ठेवले. खडसे यांनी तर जुन्या सरकारमधील मंत्र्यांकडे ओएसडी म्हणून काम केलेल्या अधिका-यांनाही आपल्याकडे नियुक्त केले होते. खडसे यांची मंत्रिपदावरून गच्छंती झाल्यानंतर भोई यांचे काय होणार असे बोलले जात होते. पण भोई यांनी आपली वर्णी विधानसभा अध्यक्षांकडे लावून घेतली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख